Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. घ्या आता..! श्रीमंत देशातही आलेय गरीब देशांतले ‘ते’ संकट.. लोकही होताहेत हैराण..

दिल्ली – गरीब देशांत महागाईचे (Inflation) संकट नवीन नाही. या संकटाचा येथील लोकांना चांगलाच अनुभव आहे. मात्र, हेच संकट जर श्रीमंत देशांत आले तर.. विश्वास बसत नाही ना, पण हे खरे आहे. युरोपातील ब्रिटेन (Britain) या श्रीमंत देशात अनेक दिवसांपासून महागाईने लोकांना हैराण केले आहे. आता तर या देशातील कमी उत्पन्न असलेले लोक दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करताना दिसत आहेत. ब्रिटनमधील अन्नाशी संबंधित समस्यांवर काम करणाऱ्या फूड फाऊंडेशन (Food Foundation) या संस्थेने एका सर्वेक्षणात म्हटले आहे की, देशातील वीस लाखांहून अधिक प्रौढ नागरिक खाद्य पदार्थांची किंमत देण्यात असमर्थ ठरत आहेत.

Advertisement

देशातील लोक इंधनावरील खर्च वाचवण्यासाठी शिजलेल्या अन्नापेक्षा न शिजलेल्या अन्नाला प्राधान्य देत आहेत. अहवालात दावा करण्यात आला आहे की लाखो लोकांनी त्यांच्या आहारात आधीच्या तुलनेत लक्षणीय घट केली आहे. देशात अन्नधान्याच्या किमती (Food And Grain Price Increase) दरवर्षी 7 टक्क्यांनी वाढत आहेत.

Advertisement

मध्यवर्ती बँकेने इशारा दिला आहे, की महागाई येत्या काही दिवसांत 10 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण, वाढत्या इंधन (Fuel) आणि खाद्यपदार्थांच्या किमतींमुळे घरगुती बजेटवर महत्त्वपूर्ण दबाव पडतो. ब्रिटनचे लोक स्वयंपाक करणे टाळत असल्याचेही संस्थेने सांगितले. पर्याय म्हणून आम्ही अशा अन्नाला प्राधान्य देत आहोत, ज्याला स्वयंपाक करण्याची गरज नाही. लोकांना जगण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, इंधन आणि उर्जेमध्ये दिलासा देण्यासाठी सरकार पुढील आर्थिक वर्षात $2200 कोटी खर्च करणार आहे.

Loading...
Advertisement

यूसीएल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इक्विटीचे संचालक प्रोफेसर सर मायकेल मार्मोट म्हणाले की, समाजातील अनेक लोकांना मूलभूत गोष्टींपासून वंचित ठेवले जात असल्याचे सर्वेक्षणाचे निष्कर्ष दर्शवतात. ते म्हणाले, की अन्न असुरक्षिततेचे हे आकडे आणखी धक्कादायक आहेत कारण ही समस्या समाधानापेक्षा आधिक बिकट होत चालली आहे.

Advertisement

अर्र.. गॅस नंतर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! ‘या’ पदार्थांची वाढणार किंमत

Advertisement
Advertisement

Leave a Reply