Take a fresh look at your lifestyle.

स्मार्टफोन खरेदीचा आहे विचार, जरा थांबा..! येतोय ‘हा’ एकदम जबरदस्त स्मार्टफोन; चेक करा डिटेसल..

मुंबई – Motorola Edge 30 स्मार्टफोन कंपनीकडून लवकरच लाँच होणार आहे. स्मार्टफोन 12 मे 2022 रोजी लाँच होईल. हा जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन असेल असा कंपनीचा दावा आहे. Motorola Edge 30 ची जाडी 6.79mm असेल. हा एक 5G स्मार्टफोन असेल, जो अत्याधुनिक तंत्रज्ञानासह (Advance Technology) येईल. तसेच ते अतिशय स्लीक आणि स्टायलिश असेल. Motorola Edge 30 स्मार्टफोनचे वजन 155 ग्रॅम असेल. हा देशातील सर्वात हलका स्मार्टफोन असेल असा कंपनीचा दावा आहे.

Advertisement

या स्मार्टफोनमध्ये 144Hz pOLED 10 बिट डिस्प्ले आहे. कंपनीच्या मते, आगामी Motorola Edge 30 स्मार्टफोन देशातील पहिला Snapdragon 778G+ सपोर्टसह येईल. जर आपण कॅमेरा सेटअपबद्दल सांगितले तर हा स्मार्टफोन क्वाड कॅमेरा सेटअप सह येईल. स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध असेल. हा देशातील पहिला 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स कॅमेरा सपोर्ट असेल. तर डेप्थ कॅमेरा सेन्सर दिला जाईल.

Advertisement

स्मार्टफोनला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन, HDR10 व्हिडिओ रेकॉर्डिंग, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट मिळेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनला अल्ट्रा-इमर्सिव्ह OLED 10-BIT कलर डिस्प्ले दिला जाईल. स्मार्टफोनमध्ये चार्जिंगसाठी 33W टर्बो चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित जवळपास स्टॉक सपोर्टसह येईल. फोनला तीन वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. म्हणजे Motorola Edge 30 स्मार्टफोन Android 13 आणि 14 अपडेट्ससह येईल. हा फोन डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह येईल. जर आपण 5G कनेक्टिव्हिटीबद्दल माहिती घेतली तर, Motorola Edge 30 स्मार्टफोनमध्ये 13 5G बँड दिले जातील.

Advertisement

दरम्यान, सध्या देशात अनेक कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन येत आहेत. कोरोना काळातही स्मार्टफोन मार्केटवर फारसा परिणाम जाणवला नाही. आता तर कोरोना आटोक्यात आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. सध्या देशात सॅमसंग, शाओमाी, ओप्पो, व्हीवो या कंपन्या आघाडीवर आहेत.

Advertisement

वाव.. सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनने केली कमाल; देशात केलेय ‘हे’ मोठे रेकॉर्ड; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply