Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ श्रीमंत देशांचा निर्धार..! रशियाचा पैसा संपविण्यासाठी केलाय ‘हा’ खास प्लान.. जाणून घ्या, राजकारण..

दिल्ली – श्रीमंत राष्ट्रांच्या G7 क्लबने रविवारी रशियन तेलावरील आपले अवलंबित्व संपविण्याचे वचन दिले. विकसित अर्थव्यवस्था असलेल्या G-7 देशांच्या नेत्यांनी रविवारी रशियाकडून तेलाची आयात (Russian Oil Import) टप्प्याटप्प्याने बंद करणार असल्याचे जाहीर केले. गटाच्या नेत्यांनी युक्रेनचे (Ukraine) अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनाही पाठिंबा व्यक्त केला. फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या सात देशांच्या गटाने रशियन ऊर्जेवरील त्यांचे अवलंबित्व कसे संपवायचे हे मात्र सांगितले नाही.

Advertisement

परंतु रशियाच्या अर्थव्यवस्थेला (Russian Economy) झटका देऊन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिनवर दबाव आणण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेतील हे महत्त्वपूर्ण असल्याचे दर्शवते. याशिवाय रशियाच्या हल्ल्याविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाची एकजूटही या कारवाईतून दिसून येते. आम्ही रशियन तेलाच्या आयातीवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासह, रशियन ऊर्जेवरील आमचे अवलंबित्व संपविण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही हे वेळेवर आणि पद्धतशीरपणे करू, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.” व्हाईट हाऊसने सांगितले की, “या हालचालींमुळे पुतिन यांच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य शक्तीला मोठा फटका बसेल आणि त्यांना युद्धासाठी त्यांच्याकडे पैसे राहणार नाहीत.

Advertisement

G-7 मध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि जपान यांचा समावेश आहे. G-7 ने एका निवेदनात म्हटले आहे की रशियाचा तेल पुरवठा थांबवल्यास “राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मुख्य साधन नष्ट होईल आणि युद्ध (War) लढण्यासाठी पैसा संपेल. आम्ही हे वेळेवर आणि सुव्यवस्थित रीतीने आणि जगाला पर्यायी पुरवठा सुरक्षित करण्यासाठी वेळ देईल याची खात्री करून घेऊ, असे G-7 नेत्यांनी सांगितले. युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल अमेरिकेने रशियावर नवीन निर्बंधही जाहीर केले.

Loading...
Advertisement

नवीन निर्बंधांमध्ये रशियाच्या तीन सर्वात मोठ्या टेलिव्हिजन स्टेशनवरील पाश्चात्य जाहिराती बंद करणे, यूएस अकाउंट आणि सल्लागार कंपन्यांना कोणत्याही रशियन लोकांना सेवा प्रदान करण्यावर बंदी घालणे आणि रशियाच्या औद्योगिक क्षेत्रावर अतिरिक्त निर्बंध घालणे समाविष्ट आहे. अमेरिकेने 9 मे ‘विजय दिन’ च्या आधी नवीन निर्बंधांची घोषणा केली, जेव्हा रशियाने 1945 मध्ये नाझी जर्मनीचा पराभव मोठ्या सैन्य परेडसह साजरा केला होता.

Advertisement

रशियावरील निर्बंधांचा फटका जगालाही.. ‘त्यामुळे’ कमी होऊ शकतात रशियावरील निर्बंध; जाणून घ्या..

Advertisement

रशियाचा अमेरिकेवर मोठा आरोप..! म्हणाला.. युक्रेनला मदत देत करतोय ‘हे’ काम; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply