Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तेल कंपन्यांनी जारी केले नवे दर.. पहा, तुमच्या शहरात पेट्रोलचे दर वाढले की घटले..

मुंबई : आज सलग 31 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्चे तेल (Crude Oil) महाग असतानाही आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे मोठा दिलासा मिळाला आहे, तर ब्रेंट क्रूडची किंमत अजूनही प्रति बॅरल 110.90 डॉलरवर आहे.

Advertisement

तेल विपणन कंपन्यांनी आज म्हणजेच सोमवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 91.45 रुपये आहे आणि डिझेल 85.83 प्रति लीटर आहे. तर, महाराष्ट्रातील परभणीमध्ये देशातील सर्वात खर्चिक पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशमध्ये डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे.

Advertisement

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 115.12 रुपये आणि 99.83 रुपये आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 122.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 105.34 रुपये प्रति लिटर आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 118.14 रुपये आणि डिझेलची किंमत 101.16 रुपये प्रति लिटर आहे. पाटण्यात पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 116.23 रुपये आणि 101.06 रुपये प्रति लिटर आहे.

Loading...
Advertisement

सध्या इंधनाच्या किंमती स्थिर आहेत. मात्र तेल कंपन्यांनी याआधीच इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे जास्त पैसे देऊन पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे आता नागरिकांना चांगलेच त्रासदायक ठरत आहे. सरकारने इंधनाच्या किंमती स्थिर ठेवण्याऐवजी या किंमती तत्काळ कमी केल्या पाहिजेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Advertisement

तेल कंपन्यांनी जारी केले नवे दर.. जाणून घ्या, तुमच्या शहरात काय आहेत पेट्रोलचे भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply