Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. घरगुती गॅस टाकीच्या दरात पुन्हा वाढ.. पहा, आता किती द्यावे लागणार पैसे..

मुंबई – महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. आजपासून पुन्हा स्वयंपाकाच्या गॅसमध्ये वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत (LPG Price) 50 रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर आता दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली आहे. याआधी मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर या महिन्यात व्यावसायिक गॅस टाकीच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

या वाढीनंतर पाटण्यात 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 1089.5 रुपये झाला आहे. त्याचवेळी लखनऊमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 1037.5 रुपये झाला आहे. पंजाबमध्ये त्याची किंमत 1035 रुपयांवर गेली आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (Election) पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. 22 मार्च रोजी, अनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडर दर 50 रुपयांनी वाढले. यापूर्वी 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. स्थानिक करांमुळे घरगुती एलपीजीच्या किमती राज्यानुसार बदलतात. इंधन (Fuel) किरकोळ विक्रेते दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमती सुधारतात. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत असतात.

Advertisement

1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस (Commercial LPG) टाकीच्या दरात 105 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 22 मार्च रोजी 9 रुपये स्वस्त झाले. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक टाकीची किंमत 1736 रुपये होती. आज म्हणजेच 1 मे रोजी व्यावसायिक गॅस टाकीची किंमत 2355.50 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच 7 महिन्यांत गॅसचे दर 619 रुपयांनी वाढले आहेत.

Loading...
Advertisement

त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान, व्यावसायिक गॅस टाकीची किंमत 170 रुपयांनी वाढली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये ते 2000 झाले आणि डिसेंबर 2021 मध्ये ते 2101 रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी 2022 ला ते स्वस्त झाले आणि 1907 रुपयांवर आले. यानंतर 1 एप्रिल 2022 रोजी दर 2253 रुपयांवर पोहोचले होते.

Advertisement

महागाईने पुन्हा दिला जोरदार झटका..! व्यावसायिक गॅस टाकीचे दर ‘इतके’ वाढले; वाचा महत्वाची माहिती.

Advertisement
Advertisement

Leave a Reply