पुणे : एकीकडे भारत देशाचा डंका जगभरात गाजत असून पाकिस्तान (Pakistan) आणि इतर देशात महागाई वाढीच्या बातम्या येत आहेत. अशावेळी आपल्या भारत देशातही सगळेच अलबेल आहे असेही नाही. होय, देशातील महागाईने सर्वसामान्यांची अवस्था दयनीय झाली आहे. बुधवारी जेव्हा आरबीआयने रेपो दरात वाढ केली, तेव्हा देशातील बँकांनीही व्याजदर वाढवले आहेत. आरबीआयच्या (RBI repo rate) या निर्णयानंतर महागाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. आता भारतात आंघोळ करणे आणि कपडे धुणेही महाग झाले आहे. होय किचनमधून सुरू झालेल्या महागाईने आता बाथरूमलाही आपल्या कवेत घेतले आहे. (Shampoos And Soaps Get Costlier Again As HUL Hikes Prices By 2 To 15 Pc All Details Here)
Weather Update: पंजाब डख यांनी यंदाच्या वर्षी पावसाबद्दल म्हटलेय ‘असे’; पहा काय अंदाज आहे त्यांचा https://t.co/ATUWDdqnAA
Advertisement— Krushirang (@krushirang) May 6, 2022
Advertisement
देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने साबण (soap), शाम्पू (shampoo) आणि इतर वैयक्तिक काळजी (personal care products) उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. एका अहवालानुसार, कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या वाढीनंतर तुमचे बाथरूमचे बजेट नक्कीच कोसळणार होणार आहे. इतकंच नाही तर HUL ने टूथपेस्ट, केचपसह इतर वस्तूंच्या किमतीही वाढवल्या असून त्यांच्या किमती 4 ते 13 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. अलीकडेच HUL चे CEO संजीव मेहता यांनी तेलाच्या किमतीत वाढ होत असताना MMCG उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले होते. कंपनीने उत्पादनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता जिथे क्लिनिक प्लस शॅम्पूच्या 100 मिली पॅकच्या किमतीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिथे इतर शॅम्पूच्या किमतीही 10 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यात 2.38 टक्क्यांच्या वाढीसह 125 ग्रॅम पिअर्स साबण आता 86 रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय मल्टीपॅकवर 3.7 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने Lux साबणांच्या काही मल्टीपॅकवर थेट नऊ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरने केवळ साबण आणि शाम्पूच्या किमतीच वाढवल्या नाहीत तर कंपनीने उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढवल्या आहेत. हॉर्लिक्सपासून ते ब्रू कॉफीपर्यंत या श्रेणी आहेत. हॉर्लिक्स (horlics), कॉफीपासून किसान केचपपर्यंतच्या किमती 4 ते 13 टक्क्यांनी वाढल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
Agriculture News: छोट्या शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज..! पहा न्यायालयाने काय आदेश दिलेत शेतकरी हिताचे https://t.co/YJvmdjMLYQ
Advertisement— Krushirang (@krushirang) May 6, 2022
Advertisement