Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Share market: म्हणून बाजाराला बसलाय मोठा झटका; पहा काय स्थिती आहे जगभरात

Please wait..

मुंबई : भारताबरोबरच (Indian Share Market) अमेरिकेलाही (USA) महागाईमुळे व्याजदर वाढवावे लागले आहेत. त्याचा परिणाम भारतीय आणि अमेरिकन शेअर बाजारात दिसून आला. गुरुवारी यूएस स्टॉक मार्केटचा प्रमुख संवेदनशील निर्देशांक डाउजन्स (Dow Jones) 3.12 टक्के किंवा 1063 अंकांनी घसरला. Nasdaq देखील 4.99 टक्क्यांनी घसरला आणि S&P 153 अंकांनी किंवा 3.56 टक्क्यांनी घसरला. Amazon चे शेअर्स 7.56 %, Facebook चे शेअर्स 6.77%, Tesla चे शेअर्स 8.33% खाली येऊन बंद झाले.

Advertisement
Loading...

बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात (RBI repo rate) वाढ करण्याच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेअर बाजाराला मोठा झटका बसला. 30 समभागांवर आधारित बीएसई सेन्सेक्स (BSE sensex) 1,306.96 किंवा 2.29 टक्क्यांनी घसरून 55,669.03 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो एका वेळी 1,474.39 अंकांवर खाली गेला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही (NSE Nifty) 391.50 अंकांनी किंवा 2.29 टक्क्यांनी घसरून 16,677.60 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी उशिरा व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. जी गेल्या 22 वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे. खरं तर यूएसमध्ये किरकोळ चलनवाढ 40 वर्षांच्या उच्चांकावर आहे आणि व्याजदर वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकेवर दबाव देखील लक्षणीय होता. फेड रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल म्हणाले, “मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण करताना महागाई 2 टक्क्यांच्या खाली ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी व्याजदरात वाढ करणे गरजेचे झाले आहे.”

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply