Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Business News: ‘त्या’मुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर..! पहा सरकारी चुकीचा कसा बसलाय फटका

मुंबई : देशभरात महाराष्ट्र राज्यासह अनेक भागात विजेचे भारनियमन (electricity issues of mahavitaran / mseb) आणि अवेळी वीज खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशावेळी मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात अघोषित वीज खंडित आणि ट्रिपिंगमुळे उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असून अनेक उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दिवसातून दहापेक्षा जास्त वेळा ट्रिपिंग होत असल्याने हजारोंचे नुकसान होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

Loading...
Advertisement

सध्या उन्हाळ्याच्या तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. कडाक्याच्या उन्हात वीजपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ग्रामणी भागात पाच वर्षापूर्वी असलेली रॉकेल कंदील आणि ढिबरी यांची प्रथा पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे. विजेवर चालणारे लघुउद्योग, व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत. अघोषित वीज कपात आणि ट्रिपिंगचा परिणाम आता उद्योग-व्यवसायावरही होऊ लागला आहे. उमरिया-डुंगरिया औद्योगिक परिसरात उद्योग चालवणारे मुनीश मिश्रा सांगतात की, त्यांनी प्लास्टिक आणि फूड प्रोसेसिंगचा उद्योग उभारला आहे. त्यात एकदा वीज ट्रिपिंग झाली तर तीन ते चार हजार रुपयांचा माल वाया जातो. ज्यामुळे मशीन पुन्हा सुरू झाल्यावर उत्पादनात फरक पडतो. तसेच गुणवत्तेतही खूप फरक होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. शिवनिटोलाजवळ विद्युत सबस्टेशनचे काम पूर्ण झाले आहे, ते तेथून जोडल्यास समस्या काही प्रमाणात सुटू शकतात, असे उद्योजक सांगतात, मात्र अधिकारी तसे करण्यास इच्छुक नाहीत. अनेकदा यामुळे यंत्र नादुरुस्त होऊन त्याचाही मोठा भुर्दंड कंपन्यांना सहन करावा लागत आहे. (India and Maharashtra energy crises because of coal and other aspect in Modi Sarakar period)

Advertisement
Advertisement

Leave a Reply