बाब्बो.. फक्त 70 दिवसातच 4 वर्षांचे नुकसान; पहा, युद्धामुळे युक्रेनला कसा बसलाय फटका..
दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला बुधवारी 70 दिवस पूर्ण झाले. कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (KSE) आणि युक्रेनच्या वित्त मंत्रालयाच्या अहवालानुसार, युद्धामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला 564 ते 600 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही रक्कम युक्रेनच्या वार्षिक जीडीपीपेक्षा चार पट जास्त आहे. म्हणजेच युक्रेनने 70 दिवसांच्या युद्धात चार वर्षांत जितके कमावले असेल तितके सगळे गमावले आहे.
70 दिवसांच्या युद्धात युक्रेनची सुमारे 92 अब्ज डॉलर्सची संपत्ती नष्ट झाली आहे. केएसईने आपल्या अहवालात हे मूल्यांकन केले आहे. अहवालानुसार, गेल्या एका आठवड्यात युक्रेनमधील युद्धामुळे एकूण 4.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर रशियन हमल्यात 90 हजार वाहने उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यांची किंमत अंदाजे $1.3 अब्ज आहे.
अहवालानुसार, युक्रेनमधील 33,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेले निवासी प्रदेश रशियन आक्रमण आणि क्षेपणास्त्र हमल्यात उद्ध्वस्त झाले आहेत. इतकेच नाही तर 23 हजार किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. घरे आणि रस्त्यांचे एकूण नुकसान $59,426 लाख डॉलर होते. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 55,97,483 लोकांनी पलायन केले आहे. हे बेघर लोक इतर देशांमध्ये आश्रय घेत आहेत. अहवालानुसार, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अजूनही 1.3 कोटी लोक युद्ध क्षेत्रात अडकले आहेत.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांच्या 33 अब्ज डॉलर (2.53 लाख कोटी रुपये) च्या मदतीबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली होती. युक्रेनने (Ukraine) मान्य केले आहे, की आता रशियन सैन्याच्या ताब्यात असलेल्या डॉनबासमधील अनेक शहरे आणि गावांचे नियंत्रण गमावले आहे. या भागांचा ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्याला खूप त्रास सहन करावा लागला होता. हे नुकसान युक्रेनच्या सैन्याला झालेल्या नुकसानापेक्षा खूप जास्त आहे. असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे मार्गदर्शक ओलेक्सी एरेस्टोविच यांनी सांगितले होते.
33 अब्ज डॉलरच्या मदतीच्या ऑफरमध्ये 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळाल्यानंतर रशियाने म्हटले आहे की, अमेरिका युक्रेनच्या नावाखाली रशिया विरोधात अप्रत्यक्ष युद्ध करत आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी या आठवड्यात अनपेक्षित बदला घेण्याचा इशारा दिला, तर त्यांचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आण्विक युद्धाचा इशारा दिला होता.
रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढला अंधार..! पहा, ‘या’ मंत्र्याने नेमके काय दिलेय वीज टंचाईचे कारण..