तेल कंपन्यांनी जारी केले नवे दर.. जाणून घ्या, तुमच्या शहरात काय आहेत पेट्रोलचे भाव..
दिल्ली – तेल विपणन कंपन्यांनी आज म्हणजेच गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज सलग 28 वा दिवस असून, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपासून जनतेला सध्या मोठा दिलासा मिळाला आहे.
जर आजच्या दराबद्दल सांगितले तर, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये लिटर आहे. तर, महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Parbhani) देशातील सर्वात खर्चिक पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 115.12 रुपये आणि 99.83 रुपये आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये (Chennai) एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे.
श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 122.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 105.34 रुपये प्रति लिटर आहे. भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 118.14 रुपये आणि डिझेलची किंमत 101.16 रुपये आहे. पाटण्यात पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 116.23 रुपये आणि 101.06 रुपये प्रति लिटर आहे.
दरम्यान, सध्या इंधनाच्या दरात वाढ होत नाही म्हटल्यावर लोकांना दिलासा मिळाला असे मात्र नाही. कारण, याआधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. सध्याच्या काळात किंमती कमी केल्या तरच लोकांना दिलासा मिळेल. मात्र, राज्य आणि केंद्र दोन्हीही सरकारे किंमती कमी करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.
तेल कंपन्यांनी जारी केले नवीन भाव; पहा, तुमच्या शहरात पेट्रोलचे दर वाढले की घटले..