Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वीज संकट वाढले..! केंद्र सरकार परदेशातून खरेदी करणार ‘इतका’ कोळसा; वाचा महत्वाची माहिती..

दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये कडक उन्हामुळे विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. मात्र कोळशाच्या पुरवठ्यात आलेल्या टंचाईमुळे नवे संकट निर्माण झाले असून अनेक राज्यांत वीजपुरवठा खंडित होत आहे. दरम्यान, या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार कोळशाची आयात (Coal Import) वाढ करण्याचा विचार करत आहे. जूनपर्यंत भारत परदेशातून 1.9 कोटी टन कोळसा आयात करण्याच्या दिशेने कार्यवाही करत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

वाढत्या उष्णतेमुळे वाढता वीजवापर लक्षात घेऊन केंद्र सरकार हे पाऊल उचलत आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा आयातदार देश आहे आणि विजेचा वाढता वापर पाहता, जास्त कोळसा मागवला जात आहे. रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की एप्रिलमधील तीव्र उन्हाळ्यामुळे भारतात गेल्या सहा वर्षांतील सर्वात भीषण वीज संकट (Electricity Crisis) निर्माण झाले आहे. उर्जा मंत्रालयाने म्हटले आहे, की केंद्र सरकारने सरकारी मालकीच्या युटिलिटीजना 22 दशलक्ष टन कोळसा आणि खाजगी पॉवर प्लांटना (Power Plant) 15.94 दशलक्ष टन आयात करण्यास सांगितले आहे.

Advertisement

ऊर्जा मंत्रालयाने राज्याच्या ऊर्जा विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, वाटप केलेल्या रकमेपैकी 50% 30 जूनपर्यंत, 40% ऑगस्टच्या अखेरीस आणि उर्वरित 10% ऑक्टोबरच्या अखेरीस वितरित करण्याची खात्री करण्यास सांगितले आहे.

Loading...
Advertisement

एप्रिल 2022 मध्ये भारतातील विजेची मागणी 13.6 टक्क्यांनी वाढून 132.98 अब्ज युनिट झाली आहे. एप्रिल 2021 मध्ये देशातील विजेचा वापर 117.08 अब्ज युनिट्स होता. वृत्तानुसार, झारखंडमध्ये सुमारे 12 टक्के कमी वीज पुरवठा होत आहे. झारखंडबरोबरच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही विजेची कमतरता जाणवत आहे. देशातील एकूण 150 पॉवर प्लांटपैकी 88 प्लांटमध्ये कोळशाची कमतरता आहे. देशातील 60 टक्के कारखान्यांना कोळशाची टंचाई जाणवत आहे. कोळशाची कमतरता असलेल्या 88 वीज प्रकल्पांपैकी 42 राज्य सरकारच्या, 32 खाजगी, 12 केंद्र सरकारच्या आणि 2 संयुक्त उपक्रमांतर्गत आहेत.

Advertisement

देशात वाढलेय विजेचे संकट..! रेल्वे ‘त्यासाठी’ करतेय कोट्यावधींचा खर्च; पहा, काय आहे प्रकार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply