Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. एअरटेलपेक्षाही स्वस्त आहे जिओचा ‘हा’ प्लान.. पहा, काय मिळतात फायदे..

मुंबई – एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्या युजर्सना 1GB दैनिक डेटासह प्रीपेड प्लान (Prepaid Plan) ऑफर करतात. हे प्लान अशा लोकांसाठी आहेत ज्यांचा डेटा वापर जास्त नाही. या कंपन्या दीर्घ किंवा मध्यम मुदतीसाठी 1GB दैनिक डेटा प्लान ऑफर करत नाहीत. युजर्स हे प्लान केवळ अल्प मुदतीसाठी मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया 1GB डेली डेटा प्लानमध्ये कोणत्या कंपनीचा प्लान चांगला आहे.

Advertisement

एअरटेल 1GB प्लान
Bharti Airtel चा 1GB दैनंदिन डेटा प्लान 209 रुपयांमध्ये येतो. या प्लानची वैधता (Validity) 21 दिवसांची आहे आणि यूजर्सना या प्लानमध्ये एकूण 21GB डेटा मिळतो. यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल (Voice Call) आणि 100 SMS मिळतात. युजर्सना Airtel Thanks फायदे देखील मिळतात. या फायद्यांमध्ये Amazon Prime Video मोबाइल आवृत्ती एक महिन्याची मोफत चाचणी, मोफत HelloTunes आणि मोफत Wynk Music यांचा समावेश आहे.

Advertisement

Reliance Jio 1GB प्लान
रिलायन्स जिओ 149 रुपयांमध्ये 1GB दैनिक डेटा प्लान ऑफर करते. हा प्लान 20 दिवसांच्या एकूण वैधतेसह येतो म्हणजे एकूण 20GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस/दिवस समाविष्ट आहेत. यासह, जिओच्या प्लानमध्ये JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity चे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. दोन्ही प्लान जवळपास सारखेच आहेत.

Loading...
Advertisement

एअरटेलच्या प्लानमध्ये युजर्सना 9.95 रुपयांमध्ये 1GB डेटा मिळत आहे, तर Jio च्या प्लानमध्ये युजर्सला 1GB डेटा 7.45 रुपयांमध्ये मिळत आहे. Jio चा प्लान खूप स्वस्त आहे, त्यामुळे युजर्स हा प्लान सतत खरेदी करत असल्याचे दिसून येते.

Advertisement

‘त्यामध्ये’ ही जिओनेच मारलीय बाजी; एअरटेलला मात्र जमलेच नाही; पहा, लहान प्लानचा काय आहे फायदा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply