Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फोडणीला बसणार झटका..! तेलानंतर आता ‘यामुळे’ बिघडणार घरखर्चाचे बजेट; जाणून घ्या..

मुंबई – 2021-2022 पीक हंगामात कमी एकर उत्पादन आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान यामुळे जिऱ्याच्या किमती 30-35 टक्क्यांनी वाढून पाच वर्षांच्या उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे. क्रिसिल रिसर्चने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, कमी उत्पन्नामुळे जिऱ्याचे भाव 165-170 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

Advertisement

पीक हंगाम 2021-22 (नोव्हेंबर-मे) मध्ये, जिऱ्याचे उत्पादन अनेक कारणांमुळे कमी राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिऱ्याचे भाव पाच वर्षांच्या उच्चांकावर जाऊ शकतात. CRISIL चा अंदाज आहे की 2021-2022 च्या रब्बी हंगामात जिऱ्याच्या किमती 30-35 टक्क्यांनी वाढून 165-170 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानुसार, रब्बी हंगाम 2021-2022 मध्ये जीर्‍याखालील क्षेत्र देखील वर्षानुवर्षे अंदाजे 21 टक्क्यांनी घटून 9.83 लाख हेक्टरवर आले आहे.

Advertisement

दोन प्रमुख जिरे उत्पादक राज्यांपैकी गुजरातमध्ये लागवडीखालील क्षेत्र 22 टक्के आणि राजस्थानमध्ये 20 टक्क्यांनी घटले आहे. शेतकऱ्यांनी मोहरी आणि हरभरा पिकांकडे वळल्यामुळे एकरी उत्पादनात घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.  पामतेलाचे भावही वाढले आहेत. जास्त किंमतीमुळे आगामी काळात  त्याचा परिणाम जाणवणार आहे.  तज्ज्ञांच्या मते, पाम तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इतर अनेक उत्पादनांच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे.

Loading...
Advertisement

महागाईचा परिणाम जगभरातील आयातीवरही दिसून येत आहे. ऊर्जेच्या वाढत्या किमतीचा परिणाम आयात कोळशाच्या किमतीवर दिसून येतो. एप्रिलमध्ये $4.74 अब्ज किमतीचा कोळसा, ब्रिकेट्सची आयात करण्यात आली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 136.4 टक्क्यांनी वाढली आहे.

Advertisement

महागाईने पुन्हा दिला जोरदार झटका..! व्यावसायिक गॅस टाकीचे दर ‘इतके’ वाढले; वाचा महत्वाची माहिती.

Advertisement
Advertisement

Leave a Reply