Recharge Plan : 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील 6 जबरदस्त प्लान; मिळतात फायदेच फायदे.. चेक करा, डिटेल..
मुंबई : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया अनेक किफायतशीर प्लान देत आहेत. परंतु बीएसएनएल देखील त्यांना कठीण स्पर्धा देत आहे. BSNL कडे असे अनेक प्रीपेड प्लान (Prepaid Plan) आहेत, जे इतर कोणत्याही कंपनीकडे नाहीत. येथे आम्ही तुम्हाला BSNL च्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्रीपेड प्लानबद्दल सांगत आहोत.
BSNL चे 200 रुपयांपेक्षा स्वस्त प्लान
या यादीतील पहिला प्लान 49 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला 24 दिवसांसाठी 100 फ्री व्हॉईस कॉल (Voice Call) मिनिटे आणि 2 जीबी डेटा मिळेल. दुसऱ्या प्लानची किंमत 99 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 22 दिवसांची वैधता (Validity) मिळेल, ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल सुविधा देण्यात आली आहे. त्याच वेळी, 135 रुपयांच्या प्लानमध्ये 24 दिवसांसाठी 1440 व्हॉईस कॉल मिनिटे दिली जातात.
पुढील प्लानची किंमत 118 रुपये आहे. या प्लानमध्ये 26 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 0.5 जीबी डेटा (Internet Data) दररोज दिला जातो. म्हणजेच तुम्हाला एकूण 13 जीबी डेटा मिळेल. असाच एक प्लान 147 रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण 30 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 10 GB डेटा मिळतो. यात बीएसएनएल ट्यून्सचीही सुविधा आहे.
आणखी दोन प्लान आहे ज्याची किंमत 185 आणि 187 रुपये आहे. 185 रुपयांमध्ये, तुम्हाला दररोज 1 GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलसह 28 दिवसांची वैधता मिळते. त्याचप्रमाणे, 187 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 2 जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. या प्लानची वैधता देखील 28 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 56GB डेटा मिळेल.