Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तेल कंपन्यांनी जारी केले नवीन भाव; पहा, तुमच्या शहरात पेट्रोलचे दर वाढले की घटले..

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. आज सलग २६ वा दिवस आहे जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपासून जनतेला दिलासा मिळाला आहे.

Advertisement

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 115.12 रुपये आणि 99.83 रुपये आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 122.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 105.34 रुपये प्रति लिटर आहे. भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 118.14 रुपये आणि डिझेलची किंमत 101.16 रुपये आहे. पाटण्यात पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 116.23 रुपये आणि 101.06 रुपये प्रति लिटर आहे.

Advertisement

देशातील सर्वात खर्चिक पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 123.46 रुपये प्रति लिटर आहे, तर आंध्र प्रदेशामध्ये डिझेल 107.61 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, 1 एप्रिल रोजी केंद्र सरकारचा कर आणि दिल्ली सरकारचा कर (Tax) पेट्रोलच्या किरकोळ किमतीच्या 44 टक्के इतका होता. हे प्रमाण राज्यानुसार बदलते. मुंबईमध्ये 1 एप्रिल रोजी पेट्रोलची किंमत प्रति लीटर 116.72 रुपये होती, जी दिल्लीपेक्षा सुमारे 15 रुपये अधिक होती. महाराष्ट्र सरकार प्रत्येक लिटर पेट्रोलसाठी 26 टक्के मूल्यवर्धित करासह (VAT) 10.12 रुपये अतिरिक्त आकारते. त्यामुळे मुंबईतील एकूण कर प्रतिलिटर 50 रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्य सरकारे स्वतंत्रपणे कर आकारतात आणि हा कर लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये सर्वात कमी आहे, जेथे तो अनुक्रमे 0 टक्के आणि 1 टक्के आहे.

Advertisement

महिन्याच्या सुरुवातालीच मिळाला दिलासा; तेल कंपन्यांनी जारी केले पेट्रोलचे नवे दर; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply