कोणत्या कंपनीचा ब्रॉडबँड प्लान आहे सर्वात स्वस्त ? ; फक्त 329 रुपयांत 1000 GB डेटा; चेक करा, डिटेल..
मुंबई – प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्सप्रमाणेच कंपन्यांकडे ब्रॉडबँड प्लानचीही (Broadband Plan) मोठी यादी आहे. तुम्ही स्वतःसाठी वेगवेगळ्या किंमतीचे प्लान घेऊ शकता. Jio, Airtel आणि BSNL च्या ब्रॉडबँड प्लानची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. येथे आम्ही तुम्हाला Jio-Airtel-BSNL च्या स्वस्त ब्रॉडबँड प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुमच्यासाठी कोणता प्लान फायदेशीर ठरेल.
एअरटेल बेसिक पॅक
एअरटेल कंपनीच्या ‘बेसिक’ प्लानची किंमत 499 रुपये प्रति महिना आहे. यामध्ये 40 एमबीपीएस इंटरनेट स्पीड देण्यात आला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना 3.3TB किंवा 3300GB डेटा दिला जातो. या ब्रॉडबँड प्लानसह Airtel Thanks फायदे देखील दिले जात आहेत, ज्यात Wynk Music आणि Shaw Academy चे सदस्यत्व समाविष्ट आहे.
Jio चा 30 Mbps प्लान
जिओचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान 399 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 30 Mbps स्पीड देण्यात आला आहे. या प्लानची FUP मर्यादा 3300Gb किंवा 3.3TB आहे. जिओ फायबर डिव्हाइसद्वारे तुम्ही एकावेळी 22 डिव्हाइस कनेक्ट करू शकता. याबरोबरच तुम्हाला कंपनीतर्फे आणखीही काही सुविधा दिल्या जातात.
बीएसएनएल ब्रॉडबँड प्लान
याआधी, बीएसएनएलचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान ‘फायबर बेसिक’ नावाचा होता, ज्याची किंमत 449 रुपये होती. प्लानमध्ये 30 Mbps चा इंटरनेट स्पीड आणि 3.3TB डेटा देण्यात आला होता. मात्र, आता कंपनीने ‘फायबर एन्ट्री’ नावाचा नवीन ब्रॉडबँड प्लान सादर केला आहे. त्याची किंमत 329 रुपये प्रति महिना आहे आणि त्यात 20 Mbps स्पीड देण्यात आला आहे. प्लानमध्ये 1000GB डेटाची मर्यादा आहे, त्यानंतर स्पीड 2 Mbps पर्यंत कमी होतो.
BSNL एकदम नवा ब्रॉडबँड प्लान..! फक्त इतक्या पैशात मिळतोय तब्बल 1000 GB डेटा..