Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लोक महागाईने हैराण, सरकारचे मात्र अच्छे दिन; एप्रिल महिन्यात जीसटीने केली कमाल; जाणून घ्या..

मुंबई : सध्याच्या वाढत्या महागाईच्या (Inflation) दिवसात केंद्र सरकारसाठी दिलासा देणारी बातमी आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक अगदीच हैराण झाले असले तरी सरकारचे मात्र अच्छे दिन आले आहेत. होय, कारण एप्रिल महिन्यातही सरकारला मोठा फायदा झाला आहे. एप्रिल महिना सरकारसाठी चांगला गेला आहे. जीएसटी कलेक्शनने (GST Collection) आधीचे सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये होते. GST लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच GST संकलनाने एकाच महिन्यात 1.50 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी ही आकडेवारी जाहीर केली.

Advertisement

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.42 लाख कोटी रुपये होते. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात 26 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हे एक चांगले गोष्ट आहे. एप्रिल, 2022 साठी एकत्रित GST महसूल 1,67,540 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये CGST रु. 33,159 कोटी, SGST रु. 41,793 कोटी, IGST 36,705 कोटी रुपयांसह वस्तू आयातीवर गोळा केलेले (IGST) रु. 81,939 कोटी आहे. इतर कर 10,649 कोटी रुपये आहे, ज्यात वस्तू आयातीवर जमा झालेल्या 857 कोटी रुपयांचा समावेश आहे.

Advertisement

सरकारने 33,423 कोटी रुपये CGST आणि IGST कडून 26962 कोटी रुपये SGST निश्चित केले आहेत. नियमित सेटलमेंटनंतर एप्रिल 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी 66,582 कोटी रुपये आणि SGST साठी 68,755 कोटी रुपये आहे. एप्रिल 2022 चा महसूल मागील वर्षातील याच महिन्यातील GST महसुलापेक्षा 20 टक्के अधिक आहे.

Loading...
Advertisement

फेब्रुवारी 2022 मध्ये, जीएसटी संकलन तब्बल 1,33,026 कोटी रुपये झाले होते. जीएसटी वसुलीचा हा आकडा फेब्रुवारी 2021 च्या तुलनेत 18 टक्के अधिक होता. त्याच वेळी, फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत 26 टक्के संकलन वाढले. जीएसटी संकलनात ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा कोरोनामुळे जानेवारीमध्ये काही राज्यांमध्ये निर्बंध लादण्यात आले होते. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेचा फारसा परिणाम झालेला नाही आणि चौथी तिमाही सुद्धा चांगली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Advertisement

महागाई काय अन् कोरोना काय..! तरीही सरकारची चांदीच; पहा, फेब्रुवारी महिन्यात किती मिळालाय जीएसटी..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply