Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आय्योव.. तडका महागला..! तब्बल 72 टक्क्यांनी वाढ; पहा कसा झटका बसलाय गृहिणींच्या खिशाला

मुंबई : घरगुती गॅस सिलिंडर (LPG gas cylinder) आणि भाज्यांच्या वाढत्या (vegetable price) किमतींमुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट (kitchen budget) आधीच बिघडले आहे. आता ते अधिक अस्थिर करण्यासाठी मसाल्यांचा वाटा वाढायला लागला आहे. होय, जीऱ्याच्या (jeera price) किमतीत वार्षिक आधारावर तब्बल 72 टक्क्यांनी वाढ झाली असून किमती नवीन विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांनी (farmers) आपले लक्ष इतर पिकांकडे वळवले आहे. त्यामुळे जिऱ्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत. (Jeera price surges 72% year-on-year to record high)

Advertisement

तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापार्‍यांनी सांगितले की, भारतातील कमी उत्पादनाचा जागतिक किमतीवर परिणाम होईल कारण हा देश जगातील सर्वात मोठा जिऱ्याचे उत्पादक आहे. गुजरातच्या उंझा (Agricultural Produce Market Committee (APMC) Unjha) मंडईमध्ये एप्रिलमध्ये वस्तूंच्या किमती 215 रुपये प्रति किलोने वाढल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) उंझा उपाध्यक्ष अरविंद पटेल यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितले की, जिऱ्याचे भाव यावर्षी सर्वोच्च पातळीवर आहेत. क्रिसिलच्या अहवालानुसार मार्च आणि एप्रिल (1-23) मध्ये मंडईतील किमती अनुक्रमे 47 टक्के आणि 72 टक्क्यांनी वाढल्या आहेत. उंझा मंडईतील किमती मार्चमध्ये 180 रुपये प्रति किलोवरून या महिन्यात सुमारे 215 रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत. गेल्या वर्षी जिऱ्याचा भाव 120 ते 125 रुपये किलो होता.

Loading...
Advertisement

गुजरातमधील (Gujarat mandi rate) उंझा मंडी, जी भारतातील 40 टक्के जिऱ्याची आवक होणारी बाजारपेठ आहे तिथे  मार्च 2022 मध्ये आवक 60 टक्क्यांनी घसरली. तर एप्रिलमध्ये (1-23) आवक 38 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये एकूण जिऱ्याचे उत्पादन वार्षिक 35 टक्क्यांनी कमी होऊन 558 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे. कमी उत्पादन आणि लागवडीखालील एकरी क्षेत्र कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे जिऱ्याच्या पेरणीच्या काळात (ऑक्टोबर-डिसेंबर 2021) शेतकरी हरभरा आणि मोहरीकडे वळले, ज्याची किंमत जिऱ्यापेक्षा जास्त आहे. गुजरातमधील द्वारका, बनासकांठा आणि कच्छ आणि राजस्थानमधील जोधपूर आणि नागौर या प्रमुख जिरे भागात अतिवृष्टीमुळे विल्ट अटॅकची शक्यता वाढली. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची लागवड करण्यापासून रोखले गेले. जगाच्या जिऱ्याच्या उत्पादनात भारताचा वाटा 70 टक्के आहे आणि 30-35 टक्के उत्पादन निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply