Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियाचा अमेरिकेवर मोठा आरोप..! म्हणाला.. युक्रेनला मदत देत करतोय ‘हे’ काम; जाणून घ्या..

दिल्ली : युक्रेनने रशियन सैन्याविरुद्धच्या युद्धात डॉनबास प्रदेशात मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. पण या लढाईत रशियन सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे मोठ्या संख्येने सैनिकही मारले गेले आणि शस्त्रांचे नुकसान झाले आहे. संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हे राजधानी कीवमध्ये उपस्थित असतानाही रशियाने हमले सुरुच ठेवले होते.

Advertisement

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांच्या 33 अब्ज डॉलर (2.53 लाख कोटी रुपये) च्या मदतीबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. युक्रेनने (Ukraine) मान्य केले आहे, की आता रशियन सैन्याच्या ताब्यात असलेल्या डॉनबासमधील अनेक शहरे आणि गावांचे नियंत्रण गमावले आहे. या भागांचा ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्याला खूप त्रास सहन करावा लागला होता. हे नुकसान युक्रेनच्या सैन्याला झालेल्या नुकसानापेक्षा खूप जास्त आहे. असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे मार्गदर्शक ओलेक्सी एरेस्टोविच यांनी सांगितले.

Advertisement

33 अब्ज डॉलरच्या मदतीच्या ऑफरमध्ये 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळाल्यानंतर रशियाने म्हटले आहे की, अमेरिका युक्रेनच्या नावाखाली रशिया विरोधात अप्रत्यक्ष युद्ध करत आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी या आठवड्यात अनपेक्षित बदला घेण्याचा इशारा दिला, तर त्यांचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आण्विक युद्धाचा इशारा दिला.

Loading...
Advertisement

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी युक्रेनियन नागरिकांवर रशियन हमल्यांचा निषेध केला आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केले जाणे वेदनादायक असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी, रशियन सैन्याने कीवमध्ये गुटेरेससमोर क्षेपणास्त्र हमला केला. यानंतर कीवमध्ये असलेल्या गुटेरेस यांनी प्रतिक्रिया दिली. युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गुटेरेस तेथे आले आहेत. त्याआधी ते रशिया दौऱ्यावरही गेले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या उपस्थितीत झालेला हा हमला म्हणजे रशियाचे युद्धाबाबतचे दावे किती खरे आहेत हे दिसून येते. रशियन सैन्य उघडपणे नागरिकांना लक्ष्य करत आहे.

Advertisement

.. म्हणून भारत आहे रशियाचा खरा मित्र.. अमेरिकेनेही मान्य केलेय स्वतःचे ‘ते’ अपयश

Advertisement

रशिया युरोपवर पु्न्हा भडकला..! युक्रेनला केलेली मदत ठरेल.. पहा, काय धमकी दिलीय

Advertisement
Advertisement

Leave a Reply