Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात पुणेकरांना जोरदार झटका..! पेट्रोल डिझेल नाही तर ‘या’ इंधनाचे वाढले भाव.. जाणून घ्या..

पुणे : महागाई थांबण्याचे नाव घेत नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत नसली तरी दुसरीकडे सीएनजीचे (CNG) भाव वाढत आहेत. पुणे (Pune) शहरात आजपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.20 रुपयांनी वाढ झाली आहे. पुणे शहरात 29 एप्रिलपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचे (Compressed Natural Gas) नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आता शहरात सीएनजी 2.20 पैशांनी वाढून 77.20 रुपये प्रति किलो होणार आहे. याआधी शहरात सीएनजीचा दर 75 रुपये किलो होता. शहरात महिनाभरात चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.

Advertisement

पुणे शहरातील सीएनजीच्या दरात महिनाभरात चार वेळा वाढ करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 15 रुपये किलो दरवाढ झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला येथे सीएनजीची किंमत 62.20 रुपये प्रति किलो होती. आधी 6 एप्रिलला त्यात 7 रुपयांनी वाढ करून 68 रुपये, नंतर 13 एप्रिलला 5 रुपयांनी वाढ करुन 73 रुपये करण्यात आले. यानंतर 18 एप्रिलला त्यात 2 रुपयांनी वाढ होऊन भाव 75 रुपये किलोवर पोहोचले. आता आजच्या वाढीनंतर सीएनजी एकूण 15 रुपयांनी खर्चिक झाला आहे.

Advertisement

1 एप्रिल रोजी राज्य सरकारने सीएनजीवरील व्हॅटमध्ये (VAT) मोठी कपात केली होती. नंतर ते 13 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणले आणि किंमतींमध्येही मोठी घसरण झाली. मात्र, त्याच दिवशी केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमती 100 टक्क्यांहून अधिक वाढ केल्या होत्या.

Loading...
Advertisement

भारत गेल्या अनेक वर्षांपासून कतर, मस्कत आणि अरब देशांकडून गॅस खरेदी करत आहे. आतापर्यंत त्याला 20 डॉलर प्रति सिलिंडर दराने गॅस मिळत होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या संकटामुळे, युरोपियन देशांमध्ये गॅसची किंमत $ 40 पर्यंत वाढली आहे. आता भारतातही त्याच किमतीत गॅस मिळत आहे. अशा स्थितीत कंपन्यांवरील खर्चाचा भारही दुपटीने वाढला आहे. जर लवकरच दर कमी झाले नाहीत तर देशात सीएनजीची किंमत 80 रुपयांपर्यंत जाईल.

Advertisement

इतकेच नाही तर आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताच्या एलएनजी मालवाहतूकीलाही सागरी मार्गाने येण्यास अडचणी येत आहेत. जोपर्यंत रशिया-युक्रेन युद्ध संपत नाही किंवा त्यावर कोणताही तोडगा निघत नाही, तोपर्यंत सीएनजीच्या किमतीबाबत कोणताही अंदाज बांधता येणार नाही.

Advertisement

.. तर पेट्रोल, डिझेल, सीएनजी मिळणार मोफत.. पहा, कुणी दिलेय ‘हे’ मोठे आश्वासन..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply