Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. आजच देशात येतोय ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन.. जाणून घ्या, काय आहेत खास फिचर..

दिल्ली – दिग्गज स्मार्टफोन कंपनी Poco आज (29 एप्रिल) आपला नवीन स्मार्टफोन Poco M4 5G लाँच करणार आहे. कंपनीने 26 एप्रिल रोजीच ही माहिती दिली होती. कंपनीच्या विक्री प्रमुखाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर स्मार्टफोनबाबत आधिक माहिती दिली होती. यामुळे फोनच्या डिझाईनची माहिती मिळते. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर आणि 5,000mAh बॅटरी मिळू शकते.

Advertisement

हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये येईल असे समोर आले आहे. Poco स्मार्टफोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा युनिट आहे. त्याशिवाय यात LED फ्लॅश देखील आहे. Poco कंपनीने आधीच जाहीर केले आहे, की Poco M4 5G 29 एप्रिल रोजी देशात लाँच होईल. Poco M4 5G स्मार्टफोन देशात Flipkart द्वारे खरेदी करता येईल.

Advertisement

कंपनीने Poco M4 5G च्या किंमतीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा स्मार्टफोन मिड-रेंज ऑफर म्हणून येऊ शकतो अशी अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 11E ची नवीन आवृत्ती असण्याचे अपेक्षित आहे, जे मार्चमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. याची किंमत Redmi Note 11E सारखीच असेल असे सांगितले जात आहे. या स्मार्टफोनच्या 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत अंदाजे 14,400 रुपये आणि 6GB + 128GB वेरिएंटची किंमत अंदाजे 15,600 रुपये असू शकते.

Loading...
Advertisement

Poco M4 5G लाँच होण्याआधी, स्मार्टफोनची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. स्मार्टफोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.58 इंच फुल HD+ LCD स्क्रीन असू शकते. फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर द्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे, 6GB RAM आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह Poco M4 5G मध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि मागील बाजूस 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असण्याची शक्यता आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 5 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. या स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली जाईल.

Advertisement

चीनी कंपनीला बसलाय मोठा झटका.. पहा, देशात कोणत्या स्मार्टफोन कंपनीने मारली बाजी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply