Take a fresh look at your lifestyle.

संकटात संकट..! चीनच्या ‘त्या’ निर्णयाने श्रीलंकेच्या अडचणी वाढणार; पहा, नेमके काय केलेय चीनने

दिल्ली : अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला (Srilanka) मानवतावादी मदतीचे आश्वासन देणाऱ्या चीनने (China) कर्जाची पुनर्रचना करण्यास नकार दिला आहे. ट्रू सिलोनच्या मते, आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चीनने दिलेली मदत पर्याप्त नाही. श्रीलंकेने चीनला आर्थिक मदत आणि कर्ज पुनर्गठनासाठी आग्रह केला होता.

Advertisement

श्रीलंकेवरील एकूण विदेशी कर्जापैकी (Loan) 10 टक्के वाटा चीनचा आहे. चीनने सहकार्य न केल्याने श्रीलंका निराश आहे. गेल्या आठवड्यात, चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी त्यांचे श्रीलंकेचे समकक्ष महिंदा राजपक्षे यांच्याबरोबर फोनवरील संभाषणात सांगितले की चीन श्रीलंकेच्या सामाजिक-आर्थिक विकासात रचनात्मक भूमिका बजावण्यास तयार आहे. श्रीलंकेसमोरील अडचणी आणि आव्हाने पाहता मला सहानुभूती वाटते, असे ते म्हणाले होते.

Advertisement

श्रीलंकेतील सुमारे 1000 कामगार संघटनांनी एक दिवसीय देशव्यापी संप (Strike) केला. सध्याच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल कामगार संघटनांनी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासह सरकारने तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. सरकारी सेवा, आरोग्य, बंदरे, वीज, शिक्षण, टपाल विभाग यांसह विविध क्षेत्रातील संघटना संपात सहभागी झाल्या होत्या. शिक्षक संघाचे प्रवक्ते म्हणाले की, जनता रस्त्यावर उतरून घरी परतण्याची मागणी करत असताना राजपक्षे सरकार सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आरोग्य कर्मचारी संघटनेने तर राजीनाम्यासाठी सरकारला एका आठवड्याची मुदत दिली आहे. देशातील नागरिकांचा वाढत असलेला संताप पाहता सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

दरम्यान, श्रीलंकेत अत्यावश्यक औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने शेजारील देशात आवश्यक औषधे पाठवली आहेत. सध्या बहुतेक औषधे भारतातून येत आहेत. कोविड आजाराच्या सुरुवातीपासून श्रीलंकेची अर्थव्यवस्था सातत्याने कोलमडत चालली आहे. त्यामुळे 2 कोटींहून अधिक लोकांना अन्न आणि औषधांची टंचाई जाणवत आहे. 1948 नंतरचे हे देशातील सर्वात मोठे आर्थिक संकट आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वेगाने घसरले आहे आणि त्यावरील विदेशी कर्ज सातत्याने वाढत आहे. गेल्या एक महिन्यापासून श्रीलंकेत आर्थिक संकट आहे. किंबहुना, चीनशी असलेली जवळीक आणि त्यातून मिळणारे प्रचंड कर्ज यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. या सर्व प्रकारामुळे श्रीलंका 51 अब्ज डॉलर्सच्या कर्जात बुडाला होता.

Advertisement

भारतानेही चीनला दिलेय प्रत्युत्तर..! चीनी नागरिकांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय.. वाचा महत्वाची माहिती..

Advertisement

चीनच्या कृपेने श्रीलंका बेहाल..! पहा काय वाईट स्थिती झालीय शेजारी देशाची

Advertisement
Advertisement

Leave a Reply