Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Share Market: त्यामुळे डिमॅट खाती उघडण्याची उडणार तारांबळ..! पहा काय असेल यासाठी कारण

Please wait..

मुंबई : एलआयसी आयपीओ २ मे रोजी अँकर्ससाठी व ४ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यास सज्ज आहे.  एलआयसी ही भारतातील सर्वांत मोठी विमा कंपनी म्हणून सर्वव्यापी आहे आणि प्रत्येक घरात ओळखीचे असलेले ब्रॅण्डनेम असल्यामुळे असंख्य रिटेल गुंतवणूकदार या इश्यूमध्ये सबस्क्राइब करण्याची शक्यता आहे. (LIC IPO and share market Demat account opening information in Marathi)

Advertisement

Advertisement
Loading...

पेटीएमचे मनीचे (Pay TM Money) मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर म्हणाले, “हा आयपीओ भारतीय भांडवली बाजारांना सर्वोत्तम महिन्याचे दर्शन घडवेल. मे महिन्यात डिमॅट खाती उघडली जाण्याचा अलीकडील काळातील विक्रम होणार असे आम्हाला वाटत आहे. भारतीय भांडवल बाजारांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, यातून लक्षावधी नवीन गुंतवणूकदार पुढे येतील असे अपेक्षित आहे. पेटीएम मनीमध्ये आम्ही या संधीसाठी उत्सुक आहोत, कारण आम्ही देशातील सर्वांत दमदार व सर्वसमावेशक ट्रेडिंग व गुंतवणूक प्लॅटफॉर्म्सपैकी एकाची उभारणी केली आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, एलआयसीने सामान्य माणसाच्या मनात अनेक दशकांपासून जो विश्वास निर्माण केला आहे, त्यामुळे श्रेणी २ व ३ शहरांतून अनेक नवीन गुंतवणूकदार पुढे येणे अपेक्षित आहे. आमचे आयपीओ उत्पादन या नवीन रिटेल व एचएनआय गुंतवणूकदारांना पेटीएम मनी व पेटीएम अॅपवरून आयपीओंसाठी अर्ज करणे सोपे करून देणार आहे.”

Advertisement

Advertisement

एलआयसी विमाधारकांनाही (LIC Insurance consumers) ६० रुपयांची सवलत मिळणार आहे, तर कर्मचारी व रिटेल गुंतवणूकदारांना ४५ रुपयांची सवलत मिळणार आहे हे बघता, छोट्या शहरांतील व गावांतील अनेक नवीन गुंतवणूकदार केवळ एलआयसी आयपीओसाठी डिमॅट खाती उघडतील अशी शक्यता आहे. एलआयसी आयपीओ व त्याचा भांडवल बाजारावरील प्रभाव यांबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक असलेले नवीन रिटेल गुंतवणूकदार तपशीलवार आयपीओ अहवाल, अर्जांची आकडेवारी तसेच पेटीएम मनीवरील अनेक लाइव्ह कार्यक्रम उपलब्ध करून घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आयपीओमध्ये सहभाग घ्यायचा की नाही तसेच किती गुंतवणूक करायची याबद्दल निर्णय घेण्यात मदत होईल.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply