Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून UPL कंपनीने ‘त्या’ गावाला दिला ५० टन झेबा; पहा नेमका काय होतोय याचा शेतीमध्ये उपयोग

Please wait..

मुंबई : शेतीमधील पाण्याच्या कमतरतेची समस्या सोडवण्यासाठी युपीएल लिमिटेड कंपनीने झिबा हे नैसर्गिकरीत्य तयार केलेले व स्टार्चचा समावेश असलेले, पूर्णपणे बिघटन होऊ शकणारे शोषक उत्पादन (अबझॉरबन्ट) तयार केले आहे. शेतात चर पाडून वापरण्यासाठी तयार केलेल झिबा मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. (UPL Ltd., a global provider of sustainable agricultural products and solutions, has provided 50 MT of Zeba to Bidal Village for Soil Application in an attempt to recognize the revolution of agriculture implemented by the Villagers.)

Advertisement

Advertisement

युपीएल लि. या शाश्वत शेती उत्पादने व सुविधा पुरवणाऱ्या जागतिक पुरवठादार कंपनीने बिदाल गावाला माती वापरासाठी ५० मेट्रिक टन झिबा पुरवले आहेत. गावकऱ्यांनी राबवलेल्या शेती क्रांतीची दखल घेण्यासाठी हा पुरवठा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कंपनीने जवळच्या १० गावांनाही उत्पादन पुरवले असून त्यामागे हा उपक्रम या गावांतही राबवण्याची योजना आहे. झिबाच्या वापरामुळे झाडांना दिले जाणारे पाणी पूर्णपणे वापरले जाईल आणि पाणी पुरवठ्याच्या फेऱ्या कमी होतील व लावलेली झाडे हमखास टिकतील. पिकाच्या मुळापाशी पोषकतत्वांच्या वापराची कार्यक्षमता वाढवते आणि मातीच्या मायक्रोबायोमवर सकारात्मक परिणाम घडवून आणत पर्यायाने मातीचे आरोग्य कायम राखते. त्यामध्ये पाण्यात आपले ४०० पट वजन शोषून घेण्याची आणि पिकाच्या गरजेनुसार ते सोडण्याची क्षमता आहे. ते मातीमध्ये सहा महिने कार्यक्षम राहाते आणि नंतर मातीला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता नैसर्गिक पद्धतीने विघटित होते. या गुणधर्मांमुळे पिके कमी पाणी घेतात व शेतीतील पाण्याचा आणि पर्यायाने सिंचनासाठी लागणाऱ्या विजेचा वापर कमी होतो. पिकाद्वारे पोषकतत्वे शोषून घेतल्यामुळे कचरा कमी होऊन पुढे प्रती एकर खताचा वापर कमी होतो.

Advertisement

Advertisement
Loading...

बिदाल हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मध्यम आकाराचे गाव असून तिथली लोकसंख्या ६५०० आहे. गेल्या ५५ वर्षांत निवडणूक न झाल्याचा विक्रम या गावाच्या नावावर असून इथले रहिवासी ग्राम पंचायत किंवा सोसायटीमध्ये आपले नेतृत्व निवडतात आणि बहुतेक उमेदवारांना विरोध होत नाही. हे गाव तंत्रज्ञान तसेच नव्या युगाच्या शिक्षण पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रसिद्ध आहे. स्थानिक शाळेतील ४२ वर्गांपैकी प्रत्येक वर्गात ऑडिओ- व्हिज्युअल शिक्षणासाठी एलईटी टीव्ही बसवण्यात आला आहे. ही सातारा जिल्ह्यातील एकमेव ग्राम पंचायच आहे, जिथे सर्व खरेदी ऑनलाइन व्यापाऱ्यांकडून होते. शिवायबिदाल पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशांपैकी एक असल्यामुळे पिण्याचे पाणी तसेच इतर गरजांसाठी लागणारे पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होते. गेल्या काही वर्षांपासून असे निदर्शनास आले आहेकी नोव्हेंबरनंतर शेतीसाठी पाणी मिळवणे अशक्य होते. १९७२ च्या दुष्काळाआधी हे गाव कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध होते आणि गावाकडे उन्हाळी कापसाच्या वरलक्ष्मी बियाण्याचे पेटंट आहे. या प्रदेशात द्राक्षं आणि इतर पिकेही घेतली जातातमात्र १९७२ च्या दुष्काळानंतर बिदालची लोकसंख्या शेती सोडून शिक्षण, सैन्यअभियांत्रिकीएमपीएससी व युपीएससीद्वारे सरकारी सेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांकडे वळाली. तेव्हापासून कापूस बियाणे उत्पादक ही या गावाची ओळख कमी होत गेली. २०१७ मध्ये बिदाल व तिथल्या गावकऱ्यांमध्ये बदल घडून आला. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून निवृत्त वरिष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन समतोल राखण्याचे निश्चित करत १९७२ नंतर हरवलेल्या आपल्या मूळ व्यवसायाकडे परत जायचे ठरवले. प्रत्येक गावकऱ्याने आपला वेळ, पैसा आणि उर्जा गुंतवत पानी फाउंडेशनच्या गावाचा कृषी वारसा पुनरूज्जीवित करण्याच्या प्रयत्नांना साथ देत जल संवधर्नासाठी काम केले. तब्बल २०० गावकऱ्यांनी दीड महिना पहाटेपासून झाडे लावण्याचे काम केले. ही झाडे जवळच्या टेकड्या, रस्ते आणि शक्य त्या प्रत्येक ठिकाणी लावण्यात आली. गावात राहाणाऱ्या १६४८ कुटुंबांपैकी प्रत्येक घराच्या परसात फळांची किमान ५ झाडे लावण्यात आली. ही झाडे टेकड्यांवर सीसीटी, लूज बोल्डर्स, डीप सीसीटी, काउंटर बंडिंग, गाबिन बंधारे यांसह माती व जल संवर्धनासाठी, जलाशय तयार करण्यासाठी व चळवळीला चालना देण्यासाठी इतर रचनांसह लावण्यात आली.

Advertisement

Advertisement

आज २०२२ मध्ये बिदाल हे जल संवर्धनातील आघाडीचे गाव असून त्यांनी आसपासच्या परिसरात २ लाख झाडे लावली आहेत. शेतकरी कांदे व ऊसासारखी रोख फळभाज्यांची पिके गेत असून ७५ एकरांत डाळिंब, ६० एकरांत आंबा आणि २५ एकरांत द्राक्षे लावण्यात आली आहेत. मात्र, प्रत्येक वर्षी गावकऱ्यांना परत त्याच आव्हानाला तोंड द्यावे लागते – ते म्हणजे उन्हाळ्यात जुनी आणि नव्याने लावण्यात आलेली पिके जपणे. विशेषतः फेब्रुवारी ते जून या कालावधीत हे आव्हान तीव्र होते, कारण गावकऱ्यांना तब्बल २ लाख झाडांना नियमितपणे पाणी द्यायचे असते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply