Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ निर्णयामुळे केंद्राचे कोट्यावधी बुडाले.. 7 राज्यांनी मात्र केली जोरदार कमाई; पहा, काय आहे नेमका प्रकार..

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कपातीवरून केंद्र आणि बिगर भाजप राज्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा वाढू शकतो. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Mdi) यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरील बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता की, केंद्राच्या विनंतीनंतरही अनेक राज्य सरकारांनी व्हॅटचा वाटा कमी केलेला नाही. या वक्तव्यावर राज्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची कपात केली होती.

Advertisement

सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीबद्दल माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केल्यामुळे केंद्र सरकारला दरमहा 8,700 रुपयांचे नुकसान होत आहे. नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत, तेलाच्या व्हॅटमध्ये कपात केली गेली, त्यांचा एकूण महसूल 15,696 कोटी रुपये होता. ज्यामध्ये एकट्या भाजप शासित राज्यांनी 11,398 कोटी रुपये सोडून दिले आहेत.

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलवरील कर हा पुन्हा एकदा राजकीय मुद्दा बनला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत 26 लाख कोटी रुपये कमावले आहेत. जगभरातील अस्थिरतेमुळे अलिकडच्या काही महिन्यांत कच्चे तेल (Crude Oil) आणि वायूच्या (Gas) किमतीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतरही 7 राज्यांनी व्हॅटचा वाटा कमी केलेला नाही. नोव्हेंबरपासून या राज्यांनी व्हॅटद्वारे 11,945 कोटी रुपये कमावले आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून असे दिसून येते, की ज्या राज्यांनी शुल्क कमी केले त्यांना 23,265 कोटी रुपयांचे अतिरिक्त नुकसान झाले, तर ज्या राज्यांनी शुल्क कपात केली नाही त्यांना 12,441 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले. काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (VAT) कमी न करणे हे सहकारी संघराज्याच्या भावनेविरोधात आहे. ते म्हणाले की, मी कोणत्याही राज्य सरकारला दोष देत नाही, तर व्हॅट तात्काळ कमी करण्याची विनंती करत आहे.

Advertisement

तेल कंपन्यांनी जारी केले नवीन दर.. पहा, पहिल्याच दिवशी पेट्रोलचे भाव वाढले की घटले..

Advertisement

इंधन दरवाढ कमी करण्यासाठी पीएम मोदींनी ‘त्या’ राज्यांना केले आवाहन.. जाणून घ्या, महत्वाची माहिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply