दिल्ली : रशियन गॅस पुरवठ्याचे देयक रशियन चलन रुबलमध्ये न केल्यास युरोपिय देशांच्या अडचणी वाढणार आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे की, ही समस्या पाश्चात्य देशांनी निर्माण केली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, जर युरोपीय देशांनी रुबलमध्ये पैसे दिले नाहीत तर रशिया त्यांचा गॅस पुरवठा (Gas Supply) थांबवू शकतो.
युरोपियन युनियनने (European Union) या मुद्द्यावर रशियावर जोरदार टीका केली आहे. मात्र, क्रेमलिनने याचा इन्कार केला आहे. ते म्हणतात, की रशिया ऊर्जा संसाधनांचा एक विश्वासार्ह पुरवठादार आहे आणि त्याच्या कराराच्या अटींना बांधील आहे. सध्याची अडचण लक्षात घेऊनच त्यांनी पेमेंट प्रक्रियेत बदल केल्याचेही सांगितले. याशिवाय अन्य कोणत्याही करारात कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान, रशियाने गॅस पुरवठा बंद केल्यास बाल्कन देशांवर त्याचा परिणाम होणार नाही, असे सर्बियाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, सर्बिया दररोज 6 दशलक्ष घनमीटर गॅस बल्गेरियाद्वारे खरेदी करतो. सर्बियाचे ऊर्जा मंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आगामी काळात परिस्थिती अधिक जटील होऊ शकते. त्यामुळे ते पर्याय शोधत आहेत.
सर्बियामध्ये रशियाचा गॅस पुरवठा केला जातो, याशिवाय देशातील तेल क्षेत्रातील मक्तेदारी देखील रशियन कंपनीच्या हातात आहे. मात्र, सर्बियाकडून रशियावर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. दरम्यान, रशियाचा गॅस पुरवठा बंद केल्याने त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही हंगेरीने म्हटले आहे.
दरम्यान, याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले होते, की “आम्ही युक्रेनला दिलेला मोठा पाठिंबा, रशियाविरुद्धचा प्रचंड दबाव आणि या प्रयत्नांमध्ये असलेल्या 30 पेक्षा जास्त देशांबरोबरच्या एकजुटीचे खरे परिणाम आहेत. रशियाच्या युद्ध उद्दिष्टांचा विचार केला तर रशिया अपयशी ठरत आहे. युक्रेन यशस्वी होत आहे. रशियाचे मुख्य उद्दिष्ट आहे की युक्रेनवर पूर्ण मात करणे, त्याचे सार्वभौमत्व काढून घेणे, त्याचे स्वातंत्र्य काढून घेणे. मात्र यामध्ये रशिया अयशस्वी ठरला आहे.”
अमेरिका, नाटो आघाडीने रशिया हैराण..! केला ‘हा’ धक्कादायक आरोप; जाणून घ्या, युद्धाचे अपडेट..
बाब्बो.. ‘त्यामुळे’ वाढलेय जगाचे संरक्षण बजेट; पहा, अमेरिका, रशिया आणि भारताने किती केलाय खर्च..