Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोळसा नाही तर ‘या’ कारणामुळे हटेना अंधार.. पहा, कशामुळे आलेय ‘हे’ वीज संकट..

दिल्ली : उन्हाळा लवकर सुरू झाल्याने देशभरात विजेच्या मागणीत (Power demand) लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याच्या स्वरूपात दिसून येत आहे. वीज निर्मिती प्रकल्पांना कोळशाची कमतरता जाणवत असल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे मुंबई, दिल्ली, लखनऊसह देशातील अनेक शहरे आणि काही ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत होत आहे.

Advertisement

कोळशाची (Coal) वाढती मागणी आणि टंचाई यामुळे उत्पादनावर परिणाम होत असून वीजपुरवठा खंडित होत आहे, असे सांगितले जात असले तरी हे सर्वस्वी खरे नाही. हे अर्धसत्य आहे. यामागचे खरे कारण काही वेगळेच आहे. मनीकंट्रोलच्या (Moneycontrol) अहवालानुसार, देशातील ऊर्जा क्षेत्राची परिस्थिती इतर क्षेत्रांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. वास्तविक, या क्षेत्रातील कंपन्यांना पेमेंटची समस्या भेडसावत आहे. कोळसा उत्पादक सरकारी मालकीच्या कोल इंडिया कंपनीचे वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे 12,300 कोटी रुपये थकले आहेत.

Loading...
Advertisement

असे असतानाही कोल इंडिया वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कोळसा विकत आहे. तसेच वीज निर्मिती कंपन्यांकडे वीज वितरण कंपन्यांचे 1.1 लाख कोटी रुपये थकीत आहेत. एवढी मोठी रक्कम भरूनही त्यांना वीज त्याच कंपन्यांना विकावी लागत आहे. या अहवालानुसार वीज वितरण कंपन्यांचा तोटा 5 लाख कोटींहून अधिक झाला आहे. अनेक राज्यांच्या सरकारने मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. याचा थेट परिणाम या कंपन्यांवर होत आहे, तर त्यांच्या तुलनेत दर वाढ करण्यात त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Advertisement

पेमेंट संकटाचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर होत आहे. दरम्यान, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, 26 एप्रिल रोजी विजेची मागणी 201 गिगावॅट या सर्वाधिक पातळीवर होती. विजेची मागणी याआधी कधीही इतक्या पातळीवर पोहोचली नव्हती. मे-जूनमध्ये ते 215-220 GW पर्यंत वाढण्याचा अंदाज मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply