Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तेल कंपन्यांनी जारी केलेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर.. पहा, तुमच्या शहरात किती आहे भाव..

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price) आज पुन्हा जाहीर करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी दरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच किमती जुन्याच पातळीवर राहतील. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्याचबरोबर लोकांना एक लिटर डिझेलसाठी 96.67 रुपये खर्च करावे लागत आहेत. इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल किती दराने विकले जाते ते जाणून घेऊ या..

Advertisement

परभणीमध्ये पेट्रोल 123.51 रुपये तर डिझेल 106.08 रुपये प्रति लिटर, श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 122.93 रुपये तर डिझेल 105.34, मुंबई पेट्रोल 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये, भोपाळमध्ये पेट्रोल 118.14 रुपये आणि डिझेल 101.16 रुपये, जयपूरमध्ये पेट्रोल 118.03 रुपये तर डिझेल 100.92 रुपये, रांची शहरात पेट्रोल 108.71 रुपये तर डिझेल 102.02 रुपये, पाटणामध्ये पेट्रोल 116.23 रुपये तर डिझेल 101.06 रुपये, बंगळुरूमध्ये पेट्रोल 111.09 रुपये तर डिझेल 94.79 रुपये, कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये तर डिझेल 96.58 रुपये, आग्रामध्ये पेट्रोल 105.03 रुपये आणि डिझेल 96.58 रुपये, लखनऊमध्ये पेट्रोल 105.25 रुपये तर डिझेल 96.83 रुपये तसेच पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 91.45 रुपये तर डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर या दराने विक्री होत आहे.

Loading...
Advertisement

1 एप्रिल रोजी केंद्र सरकारचा कर आणि दिल्ली सरकारचा कर (Tax) पेट्रोलच्या किरकोळ किमतीच्या 44 टक्के इतका होता. हे प्रमाण राज्यानुसार बदलते. मुंबईमध्ये 1 एप्रिल रोजी पेट्रोलची किंमत प्रति लीटर 116.72 रुपये होती, जी दिल्लीपेक्षा सुमारे 15 रुपये अधिक होती. महाराष्ट्र सरकार प्रत्येक लिटर पेट्रोलसाठी 26 टक्के मूल्यवर्धित करासह (VAT) 10.12 रुपये अतिरिक्त आकारते. त्यामुळे मुंबईतील एकूण कर प्रतिलिटर 50 रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्य सरकारे स्वतंत्रपणे कर आकारतात आणि हा कर लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये सर्वात कमी आहे, जेथे तो अनुक्रमे 0 टक्के आणि 1 टक्के आहे.

Advertisement

पेट्रोलच्या खर्चाचे टेन्शन होईल कमी.. ‘या’ कंपनीची दुचाकी लवकरच करणार कमाल.. जाणून घ्या, डिटेल

Advertisement
Advertisement

Leave a Reply