Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Tata Sons News: शापूरजी पालोनजी समूहाने मतदानाबाबत घेतला ‘तो’ निर्णय; चंद्रशेखरन यांना पुनर्नियुक्ती

Please wait..

मुंबई : टाटा समूहाच्या कंपन्यांची प्रवर्तक आणि होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या भागधारकांनी एन चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्तीला मान्यता दिली आहे. कंपनीच्या भागधारकांनी चंद्रशेखरन यांच्या पुढील पाच वर्षांसाठी पुनर्नियुक्तीला मान्यता दिली आहे, अशी माहिती पीटीआयने मंगळवारी सूत्रांच्या हवाल्याने दिली. तथापि, त्याचा सर्वात मोठा भागधारक शापूरजी पालोनजी ग्रुपने मतदानात भाग घेतला नाही.

Advertisement

Advertisement
Loading...

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, टाटा सन्सच्या बोर्डाने एन चंद्रशेखरन यांची आणखी पाच वर्षांसाठी म्हणजेच फेब्रुवारी 2027 पर्यंत कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती. यानंतर आता भागधारकांना यावर निर्णय घ्यायचा होता. चंद्रशेखरन यांची दुसऱ्या टर्मसाठी पुन्हा नियुक्ती करण्यासाठी 50 टक्क्यांहून अधिक मतांची आवश्यकता होती कारण सोमवारी झालेल्या भागधारकांच्या बैठकीत हा एक सामान्य प्रस्ताव होता. टाटांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच बरोब, सूत्रांनी असेही सांगितले की, माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे शापूरजी पालोनजी कुटुंब चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती आणि जेपी मॉर्गन इंडियाचे अध्यक्ष लिओ पुरी यांची टाटा सन्सच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्तीसाठी मतदान करण्यापासून दूर राहिले. शापूरजी पालोनजी समूहाची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के भागीदारी आहे.

Advertisement

एन चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 मध्ये मोहनूर, तामिळनाडू येथे झाला. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमसीए केले आहे. 1987 मध्ये ते टाटा समूहाशी जोडले गेले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली TCS ही टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी बनली तसेच नफ्याच्या बाबतीत सर्वात यशस्वी ठरली. चंद्रशेखरन, ज्यांना चंद्रा या नावाने ओळखले जाते, त्यांचा ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या बोर्डात समावेश करण्यात आला होता. जानेवारी 2017 मध्ये त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. ते टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टीसीएस सारख्या कंपन्यांच्या बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत. (Tata Sons Shareholders Approve Reappointment Of Chandrasekaran As Chairman Shapoorji Pallonji Family Abstains From voting)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply