Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कंगाल पाकिस्तानचे टेन्शन होणार कमी.. या संघटनेने कर्जाबाबत घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या..

दिल्ली- पाकिस्तानमध्ये गंभीर आर्थिक संकट आहे. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील नवीन सरकारला दिलासा देत, IMF ने रखडलेले बेलआउट पॅकेज एक वर्षाने वाढ करण्यास आणि कर्जाची रक्कम $8 अब्ज पर्यंत वाढ करण्यास सहमती दर्शविली आहे.

Advertisement

एक्स्प्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पाकिस्तानचे (Pakistan) नवे अर्थमंत्री आणि IMF चे उपव्यवस्थापकीय संचालक यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा करार केला आहे. आयएमएफने मान्य केले आहे, की हा कार्यक्रम सप्टेंबर 2022 अखेरपासून आणखी नऊ महिने ते एक वर्ष वाढ केला जाईल, तर कर्जाचा (Loan) आकार सध्याच्या $6 बिलियन वरून $8 अब्ज पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.

Advertisement

याआधी मागील सरकारने 39 महिन्यांच्या विस्तारित निधी सुविधेवर (जुलै 2019 ते सप्टेंबर 2022) एकूण US $ 6 अब्ज मूल्यावर स्वाक्षरी केली होती. तथापि, मागील सरकार आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले आणि US$ 3 अब्ज न दिल्याने अडचणी वाढल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे प्रकरण IMF बोर्डाकडे मंजुरीसाठी नेण्याआधी पाकिस्तानला पुढील आर्थिक वर्ष 2022-23 च्या बजेट रणनितीवर सहमती द्यावी लागेल.

Loading...
Advertisement

सूत्रांनी सांगितले की विस्तारित कार्यक्रमाला अंतिम रूप देण्यासाठी IMF मिशन 10 मे पासून पाकिस्तानला भेट देणार आहे. मागील सरकारने घेतलेल्या “बेजबाबदार” निर्णयांच्या संदर्भात अर्थसंकल्पाची (Budget) स्थिती पाहण्यासाठी पाकिस्तान आणि आयएमएफचे तांत्रिक कर्मचारी सोमवारपासून बैठका सुरू करतील. पाकिस्तानवरील आपल्या ताज्या अहवालात, आयएमएफने देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या अंदाजे 4.8 टक्क्यांच्या तुलनेत वार्षिक 4 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आयएमएफने बेलआउट पॅकेजची पुन्हा अंमलबजावणी करण्यासाठी मागण्यांची यादी पुढे केली आहे. यामध्ये इंधन सबसिडी काढून घेणे, करमाफी योजना रद्द करणे, विजेचे दर वाढ करणे आणि अतिरिक्त कर आकारणी उपाय लागू करणे यांचा समावेश आहे.

Advertisement

.. म्हणून पाकिस्तानमध्ये वाढणार इंधनाचे भाव; सरकारने ‘त्या’ अटी केल्या मान्य.. जाणून घ्या, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply