Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Electric Scooter: म्हणून ई-बाईकची काढली गाढव धिंड..! पहा नेमके काय कारण घडले यासाठी

औरंगाबाद : देशात ई-स्कूटरला आग लागण्याच्या घटनांनंतर अनेकांना मोठा आर्थिक आणि मानसिक झटका बसला आहे. अशातच आता एका संतप्त व्यावसायिकाने गाढवाला बांधून या ई-बाईक गाडीची मिरवणूक काढल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील परळी वैजनाथ येथील एका व्यावसायिकाने खरेदीच्या १५ दिवसांनंतर त्याची ई-स्कूटर चालवणे बंद केले. वारंवार तक्रारी करूनही त्यास दुरुस्त करू शकले नाहीत, त्यामुळे रागाच्या भरात व्यावसायिकाने त्याला दोरीने गाढवाला बांधून गावात फिरवले.

Advertisement

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील व्यापारी सचिन गीते यांना कंपनीने ई-स्कूटरमधील त्रुटी दूर न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. गीते यांनी एका नामांकित कंपनीची बॅटरीवर चालणारी ही स्कूटर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 20 हजार रुपये देऊन बुक केली होती. त्यानंतर 21 जानेवारी 2022 रोजी त्यांनी उर्वरित 65 हजार रुपयेही भरले होते. 24 मार्च 2022 रोजी त्यांना या स्कूटरची डिलिव्हरी मिळाली. पीटीआयशी झालेल्या चर्चेत गीते म्हणाले की, मी ही स्कूटर पूर्ण रक्कम भरून खरेदी केली होती, पण ती 8 एप्रिलला बंद पडली. यावर मी संबंधित कंपनीच्या कस्टमर केअरची माहिती घेतली आणि तक्रार केली, मात्र कंपनीने योग्य प्रतिसाद दिला नाही. ते म्हणाले की, आपण प्रयत्न केले तर आपल्याला देवही सापडतो, पण या कंपनीचे लोक शोधणे अवघड आहे. नवीन स्कूटरमध्ये झालेल्या बिघाडामुळे तो इतका अस्वस्थ झाल्याचे त्याने सांगितले की, एकदा ती जाळण्याचा विचार केला.

Loading...
Advertisement

गीते म्हणाले की, वारंवार तक्रारी केल्यावर कंपनीने मेकॅनिकला पाठवले. यानंतरही समस्या कमी झाली नाही आणि माझी स्कूटर बराच वेळ एकाच जागी उभी राहिली. त्यावर मला वाटले की ही स्कूटर काही उपयोगाची नाही, त्यामुळे राग आल्यावर तिला आग लावण्याचा विचारही केला, पण त्यानंतर ती गाढवाला बांधण्याचा विचार आला. तसेच कंपनीविरोधात ग्राहक मंचात गुन्हा दाखल करण्याचाही विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे इलेक्ट्रोनिक बाईक आणि कार वापरण्याचा जो सल्ला देत आहेत तोही आता देशातील अनेकांच्या डोकेदुखीचे कारण बनला आहे. पेट्रोल दरवाढ आणि आता इकडे इ-बाईक बेकार निघत असल्याने नागरिकांनी अवस्था खूपच बिकट होत आहे. (Maharashtra : Man Ties Faulty Electric Scooter To Donkey, Parades It Round Town)

Advertisement
Advertisement

Leave a Reply