Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Palm Oil Crisis: खाद्यतेल दरवाढीचा बसणार मोठा झटका..! पहा आणखी कशाची होणार आहे भाववाढ

Please wait..

मुंबई : देशातील खाद्यतेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे इंडोनेशिया देश 28 एप्रिलपासून पाम तेलाची निर्यात थांबवत आहे. या निर्णयाचा भारतावर सर्वाधिक परिणाम होणार आहे. कारण भारत निम्म्याहून अधिक पामतेल इंडोनेशियाकडून खरेदी करतो. पामतेल महागल्याने खाद्यतेल तर महागणारच, पण शाम्पू-साबणापासून ते केक, बिस्किटे, चॉकलेट्सपर्यंतच्या किमती वाढणार आहेत. (Palm Oil Crisis: Prices Of Shampoo Soap Chocolate And Many Products May Increase Indonesia Will Ban Exports)

Advertisement

Advertisement
Loading...

तज्ज्ञांनी सांगितले की, अनेक तेलांमध्ये पाम तेल मिसळले जाते. कारण त्याला सुगंध नसतो. एफएमसीजी आणि सौंदर्य प्रसाधने कंपन्याही पाम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. भारत सुमारे 9 दशलक्ष टन पामतेल खरेदी करतो. यातील 70 टक्के पामतेल इंडोनेशियामधून आयात केले जाते. इंडोनेशियातून पामतेल निर्यात बंद झाल्यानंतर मलेशियावरील अवलंबित्व वाढेल आणि खाद्यतेलाच्या किमती वीस टक्क्यांनी वाढू शकतात. पाम तेल हे जगभरातील सर्वात लोकप्रिय वनस्पती तेल आहे. जगभरातील सुमारे 50 टक्के घरगुती उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो. पाम तेलाचा सर्वाधिक वापर स्वयंपाकाचे तेल म्हणून केला जातो. हे शाम्पू, आंघोळीचे साबण, टूथपेस्ट, व्हिटॅमिन गोळ्या, कॉस्मेटिक उत्पादने, केक आणि चॉकलेट इत्यादींमध्ये देखील वापरले जाते.

Advertisement

Advertisement
  • हिंदुस्तान युनिलिव्हर: कंपनीने 2016 मध्ये सांगितले की ती आपल्या उत्पादनांमध्ये दरवर्षी 10 लाख टन कच्चे पाम तेल वापरते. कंपनी साबण, शैम्पू, क्रीम, फेस वॉशसह डझनभर कॉस्मेटिक उत्पादने तयार करते.
  • नेस्ले: किटकॅट चॉकलेट निर्मात्याने 2020 मध्ये 4.53 लाख टन पाम तेल विकत घेतले. त्यातील बहुतांश इंडोनेशियामधून खरेदी करण्यात आले होते, तर काही मलेशियामधून आयात करण्यात आले होते.
  • प्रॉक्टर अँड गॅम्बल: कंपनीने 2020-21 मध्ये 6.05 लाख टन पाम तेल खरेदी केले होते. मुख्यतः घरगुती काळजी आणि सौंदर्यप्रसाधने उत्पादने तयार करण्यासाठी वापरली जाते.
  • मॉन्डेलेझ इंटरनॅशनल: ओरियो बिस्किटे बनवणारी कंपनी तिच्या उत्पादनांमध्ये वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाम तेल खरेदी करते.
  • L’Oreal: कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये पाम तेल वापरते. 2021 मध्ये त्यांनी 310 टन पाम तेलाचा वापर केला.

Advertisement

सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ही खाद्यतेल उद्योगाची संघटना आहे. इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवर प्रस्तावित बंदीबाबत सरकारी पातळीवर त्वरित चर्चा करण्याची सूचना केली आहे. SEA चे महासंचालक बी.व्ही. मेहता म्हणाले की, इंडोनेशियाच्या निर्णयाचा आपल्या देशांतर्गत बाजारपेठेवर गंभीर विपरीत परिणाम होईल कारण पाम तेलाच्या एकूण आयातीपैकी निम्मी आयात तिथून होते. ही पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. त्यामुळे याबाबत आम्ही केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या संपर्कात आहोत. सध्या इंडोनेशियाच्या देशांतर्गत बाजारपेठेत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या तेलाच्या किमतीत सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाद्यतेल रिफायनरी कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल आणि सोयाबीन तेल आधीच वाढले आहे. इंडोनेशियन तेलावरील बंदी त्वरीत हाताळली नाही, तर त्याचे फार मोठे विपरित परिणाम होतील.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply