Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. गुजरातच्या समुद्रात 280 कोटींचे हेरोईन जप्त..! पहा कशामध्ये झालीय ही मोठी कारवाई

Please wait..

मुंबई : अरबी समुद्रातून पाकिस्तानी बोट पकडण्यासाठी भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात एटीएसला गोळीबार करावा लागला होता. दरम्यान या कारवाईत पाक बोटीवरील नऊ जणांकडून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मुंद्रा पोर्टवरील हजारो कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या कारवाईनंतर ही आज आणखी एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी ही माहिती दिली. ‘अल हज’ या पाकिस्तानी बोटीला तटरक्षक दलाच्या गस्तीनौकांनी भारतीय पाण्यातून पकडले. पाकिस्तानी मासेमारी बोट वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी भारतीय तटरक्षक दलाच्या बोटीने त्याचा पाठलाग केला. त्यांना रोखण्यासाठी भारतीय टीमला गोळीबार करावा लागला. या कारवाईत बोटीचा एक क्रू मेंबर जखमी झाला तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले. काही वेळातच या परिसरात असलेल्या अंकित या तटरक्षक दलाचे जहाज त्याला पकडण्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले. पाकची बोट आज दुपारी 3 वाजता जाखू बंदरात पोहोचेल.

Advertisement

Advertisement

ICG अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी बोट ‘अल हज’ नऊ जणांसह रविवारी रात्री उशिरा भारतीय पाण्यात घुसली होती. ती हेरॉईनची पाकिटे भारतीय हद्दीत फेकण्याचा प्रयत्न करत होती. ठोस गुप्तचर माहितीनंतर, गुजरात एटीएसच्या दोन अधिकाऱ्यांना तटरक्षक दलाच्या जहाजासह घटनास्थळी पाठवण्यात आले. दरम्यान, हे पाकीट फेकताना पाकची बोट पकडण्यात आली. गुजरातमध्ये यापूर्वीही पाकिस्तानी बोटीतून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुजरातच्या किनारपट्टीवर 77 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. बोटीच्या सहा क्रू मेंबर्सना भारतीय पाण्यातून अटक करण्यात आली. (Gujarat: Pakistani Boat Caught From Arabian Sea, Nine People Arrested, Heroin Worth 280 Crores Seized)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply