Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Future Group- Reliance Deal: म्हणून रिलायंसला बसला झटका; रिटेल सेक्टरमध्ये ‘फ्युचर’कडे लागले सर्वांचे लक्ष

Please wait..

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने शनिवारी सांगितले की, फ्यूचर ग्रुपसोबतचा 24,713 कोटी रुपयांचा करार पुढे जाऊ शकत नाही. कारण फ्यूचर ग्रुपच्या सुरक्षित कर्जदारांनी या कराराच्या विरोधात मतदान केले आहे. त्यांची मंजुरी न मिळाल्याने हा करार आता कोलमडला आहे. या संदर्भात रिलायन्सने नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती शेअर केली आहे. (Reliance Calls Off Rs 24713 Crore Deal With Future Group After Secured Creditors Give Thumbs Down)

Advertisement

Advertisement
Loading...

शुक्रवारी फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या सुरक्षित कर्जदारांनी डीलच्या विरोधात मतदान केले होते. त्यानंतर रिलायन्सने शनिवारी या डीलमधून माघार घेतली. फ्युचर ग्रुपला कर्ज देणाऱ्या पतसंस्थांनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्युचर रिटेल अॅसेट यांच्यातील 24,730 कोटी रुपयांचा करार नाकारला आहे. या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व कर्जदारांनी रिलायन्सने मांडलेल्या व्यवस्था योजनेच्या विरोधात मतदान केले होते. रिलायन्स आणि फ्युचर यांच्यातील करारावर भागधारक आणि कर्जदारांची मान्यता मिळविण्यासाठी फ्युचर ग्रुपच्या संबंधित कंपन्यांनी या आठवड्यात दोन स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर फ्युचर ग्रुपने माहिती दिली की भागधारक आणि असुरक्षित कर्जदारांनी या कराराला मंजुरी दिली आहे. परंतु सुरक्षित कर्जदारांनी योजना नाकारली आहे. यानंतर आता हा करार लागू करता येणार नसल्याचे सांगत रिलायन्स इंडस्ट्रीजने हा करार रद्द केला.

Advertisement

Advertisement

ऑगस्ट 2020 मध्ये फ्यूचर ग्रुपने रिलायन्स ग्रुप यांची कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) सह 24,713 कोटी रुपयांच्या विलीनीकरण कराराची घोषणा केली होती. या कराराअंतर्गत, रिलायन्स रिटेलला किरकोळ, घाऊक, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग विभागात कार्यरत असलेल्या 19 फ्युचर ग्रुप कंपन्यांचे अधिग्रहण करायचे होते. दरम्यान, यापूर्वी 2019 मध्ये Amazon ने फ्यूचर कूपन (फ्यूचर ग्रुपची होल्डिंग कंपनी) मधील 49 टक्के हिस्सेदारी 1,500 कोटी रुपयांना विकत घेतली होती. या डील अंतर्गत अॅमेझॉनला 3 ते 10 वर्षांच्या आत फ्युचर रिटेलमधील भागभांडवल विकत घेण्याचा अधिकार देखील मिळाला होता. परंतु, रिलायन्स रिटेलसोबत फ्युचर ग्रुपच्या करारानंतर अॅमेझॉनने या डीलला आक्षेप घेतला होता. तेव्हापासून दीर्घकाळ ही कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यात रिलायन्स कंपनीला आता झटका बसला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply