Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Health Insurance: म्हणून मेडिक्लेममध्येही होणार भारताचा उच्चांक; पहा कशाचा बसणार आहे ग्राहकांना झटका

Please wait..

मुंबई : देशात सतत वाढणाऱ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचा (group health insurance) प्रीमियम देखील या वर्षी 15% पर्यंत वाढू शकतो. इतर आशियाई देशांच्या तुलनेत भारतात ही वाढ सर्वाधिक असेल. हे सलग तिसरे वर्ष असेल ज्यामध्ये प्रीमियममध्ये दुहेरी अंकांनी वाढ होईल. मर्सर मार्श बेनिफिट्स (MMB) यांनी सर्वेक्षणात म्हटले आहे की, ही वाढ सामान्य महागाई दरापेक्षा तिप्पट आहे. सर्वेक्षण केलेल्या 81% आशियाई विमा कंपन्यांनी सांगितले की 2021 मध्ये साथीच्या आजाराने (medical emergency) वैद्यकीय दाव्यांमध्ये वाढ केली आहे. आरोग्य विम्याच्या (mediclaim) मागणीतही वाढ झाली आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

भारतात दरवर्षी सुमारे 58 लाख लोकांचा असंसर्गजन्य आजारांमुळे मृत्यू होतो. कर्करोगाचे रुग्ण यापैकी जास्तीत जास्त 55% दावे करतात. 43% दावे रक्ताभिसरण प्रणालीशी संबंधित आजारांनी ग्रस्त रुग्णांद्वारे केले जातात. दाव्यात कोरोना ग्रस्त रुग्णांचा वाटा 36% आहे. कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना दिलेली ही एक सुविधा आहे जी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय कव्हरेज प्रदान करते. यासाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून प्रीमियम भरला जातो. कर्मचारी जोपर्यंत कंपनीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला हा लाभ मिळतो. साथीच्या आजारापूर्वीच्या तुलनेत उपचारांचा खर्च वाढला आहे. दाव्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे विमा कंपन्यांचा खर्च वाढला आहे. कंपन्यांनी आता काही बोजा ग्राहकांवर टाकण्याची तयारी केली आहे, असे जॉन कोलर (आशिया क्षेत्रीय प्रमुख अधिकारी, MMB) यांनी म्हटले आहे. (Mercer Marsh Benefits Survey Claims: Group Health Insurance Can Be Expensive By Up To 15 Percent, Premium Will Be)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply