Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

India Post Issues Warning: पोस्टाच्या ‘त्या’ मेसेजपासून सावधान..! झटक्यात बसेल मोठाच फटका

मुंबई : इंडिया पोस्टने देशवासीयांना इशारा दिला आहे की, काही बनावट वेबसाइट्सपासून सावध राहण्याची गरज आहे. शनिवारी दिलेल्या निवेदनात भारतीय पोस्ट विभागाने म्हटले आहे की, सोशल मीडियावरील काही वेबसाइट सर्वेक्षण आणि प्रश्नमंजुषाद्वारे सरकारी अनुदान देण्याचे कारण देत आहेत. जो पूर्णपणे खोटा दावा आहे. त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. नाहीतर आपणास मोठा झटका बसू शकतो.

Advertisement

इंडिया पोस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आम्ही देशातील जनतेला कळवू इच्छितो की, आम्ही अशा कोणत्याही गोष्टीत सहभागी नाही. आम्ही कोणत्याही सर्वेक्षण किंवा प्रश्नमंजुषेच्या आधारावर कोणतीही सबसिडी, बोनस किंवा बक्षिसे जाहीर केलेली नाहीत. तुम्हाला अशा सूचना, ईमेल किंवा मेसेज आल्यास त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. निवेदनात म्हटले आहे की, अशा बनावट वेबसाइटवर तुमची जन्मतारीख, बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक, जन्म ठिकाण इत्यादी तपशील शेअर करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा बनावट ई-मेल, संदेश पाठवणाऱ्या बनावट वेबसाइटच्या फसवणुकीवर इंडिया पोस्ट कठोर भूमिका घेत आहे. इंडिया पोस्टच्या निवेदनानुसार, या बनावट वेबसाइट्सविरोधात कारवाई सुरू करण्यात येत आहे. या वेबसाइट्सच्या URL आणि लिंक तपासल्या जात असून त्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे अशा प्रलोभनांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका.

Loading...
Advertisement

वास्तविक, आजकाल बनावट लकी ड्रॉ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये लोकांना वैयक्तिक माहिती शेअर करण्याच्या बदल्यात 6,000 रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो फॅक्ट चेकने हा खोटा दावा उघड केला आहे. त्यानुसार हा घोटाळा असून त्याचा इंडिया पोस्टशी काहीही संबंध नाही. (India Post Issues Warning Against Fake Websites Claiming To Provide Subsidies)

Advertisement
Advertisement

Leave a Reply