Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Stock Market Opened On Red Mark: म्हणून कोसळला शेअर बाजार; पहा काय झालीय नेमकी दुर्दशा

मुंबई : कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी आज भारतीय शेअर कोसळला. बाजारावर गेल्या आठवड्यातील घसरणीचा परिणाम दिसत होताच त्यातच जागतिक नकारात्मक बातम्यांनी दोन्ही निर्देशांक लाल चिन्हावर उघडले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 711 अंकांनी किंवा 1.24 टक्क्यांनी घसरून 56,486 वर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 226 अंकांनी किंवा 1.32 टक्क्यांनी घसरून 16,946 वर उघडला.

Advertisement

बाजार उघडल्यानंतर सुमारे 737 शेअर्स वधारले, 1553 शेअर्स घसरले आणि 127 शेअर्स अपरिवर्तित राहिले. या कालावधीत ICICI बँक, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि NTPC निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले. तर ब्रिटानिया इंडस्ट्रीज, अपोलो हॉस्पिटल्स, एचयूएल, बीपीसीएल आणि इंडसइंड बँक तोट्यासह उघडले. तत्पूर्वी, गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार लाल चिन्हावर उघडला आणि दिवसभराच्या व्यवहारानंतर घसरणीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 714 अंकांनी किंवा 1.23 टक्क्यांनी घसरून 57,197 वर बंद झाला, तर NSE निफ्टी निर्देशांक 221 अंकांनी घसरला आणि 17,172 वर बंद झाला होता. (Stock Market Opened On Red Mark Sensex Slips More Than 700 Points Nifty Below 17000 Know Latest Update Here)

Loading...
Advertisement

Advertisement

Leave a Reply