Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर.. फक्त 5 दिवसात सोन्याचे भाव ‘इतके’ घटले.. जाणून घ्या, काय आहे परिस्थिती..

दिल्ली : देशातील सोने मार्केटमध्ये सोन्याच्या दरात साप्ताहिक घसरण नोंदली गेली आहे. तसेच चांदीचे दर सुद्धा कमी झाले आहेत. या व्यापार सप्ताहात सोन्याच्या दरात (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 1,129 रुपयांची घट नोंदली गेली आहे, तर चांदीच्या दरात (Silver Price) 3424 रुपयांची मोठी घसरण नोंदली गेली आहे. IBJA वेबसाइटनुसार, या व्यावसायिक सप्ताहाच्या सुरुवातीला (18 मार्च ते 22 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा दर 53 हजार 603 होता, जो शुक्रवारपर्यंत 52 हजार 474 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. त्याच वेळी चांदीची किंमत 70 हजार 109 रुपयांवरुन 66 हजार 685 रुपये प्रति किलो आहे.

Advertisement

18 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 53 हजार 603 प्रति 10 ग्रॅम होता. 19 एप्रिल रोजी 53 हजार 499 रुपये, 20 एप्रिलला 52 हजार 752 रुपये, 21 एप्रिल रोजी 52 हजार 540 आणि 22 एप्रिल रोजी 52 हजार 474 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता.

Advertisement

चांदीच्या दराबाबतीत 18 एप्रिल रोजी चांदीचा भाव 70 हजार 109 रुपये प्रति किलो होता. 19 एप्रिलला 70 हजार 344 रुपये, 20 एप्रिल रोजी 68 हजार 590 रुपये, 21 एप्रिल रोजी 67 हजार 330 रुपये आणि 22 एप्रिल रोजी 66 हजार 685 रुपये प्रति किलो चांदीचा भाव होता.

Advertisement

हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2021-22 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात (Export) वाढली आहे आणि मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे 55 टक्क्यांनी वाढून $ 39.15 अब्ज झाली आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने सांगितले की, 2020-21 मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात $25.40 अब्ज होती.

Loading...
Advertisement

गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात (Gold Import) 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात देशाची सोन्याची आयात $34.62 अब्ज होती. 2021-22 या आर्थिक वर्षात हिरे आणि दागिन्यांची निर्यात जवळपास 50 टक्क्यांनी वाढून $39 अब्जपर्यंत पोहोचली आहे.

Advertisement

आजही सोने 50 हजारांपार, चांदीही चमकली; जाणून घ्या, काय आहेत सोन्या-चांदीचे नवीन भाव..

Advertisement

सोने-चांदी बाजारभाव; जाणून घ्या, आज सोन्या-चांदीचे भाव वाढले की घटले..

Advertisement
Advertisement

Leave a Reply