Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून पाकिस्तानमध्ये वाढणार इंधनाचे भाव; सरकारने ‘त्या’ अटी केल्या मान्य.. जाणून घ्या, डिटेल..

दिल्ली : पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत खराब परिस्थितीत आहे. शाहबाज शरीफ सरकार आल्यानंतरही पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Economy) रुळावर येताना दिसत नाही. दरम्यान, शाहबाज सरकार आता काही निर्णय घेऊ शकते, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. पाकिस्तानच्या नव्या सरकारने आर्थिक मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे अहवालात म्हटले आहे.

Advertisement

वृत्तसंस्था एएफपीच्या अहवालात म्हटले आहे, की IMF च्या दोन प्रमुख अटींपैकी एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरील सरकारी अनुदान (Subsidy) कमी करणे. अहवालानुसार, पाकिस्तानचे नवे अर्थमंत्र्यांनी 22 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील सबसिडी कमी करण्यास मंजुरी दिली आहे. याबरोबरच त्यांनी व्यापार कर सवलत योजना बंद करण्याच्या IMF च्या शिफारशींना होकार दिला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये (Pakistan) पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

Advertisement

इम्रान खान पंतप्रधान असताना हे पॅकेज 2019 मध्ये IMF ने मंजूर केले होते. मात्र, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संथ आर्थिक सुधारणा पाहता पॅकेजची रक्कम हळूहळू वितरित केली जात होती. आयएमएफने इंधनावरील सबसिडी काढून टाकण्याबाबत सांगितले आहे आणि पाकिस्तान सरकारने त्याला सहमती दर्शवली आहे. पाकिस्तान सरकारला अनुदान देणे शक्य नाही. त्यामुळे आपल्याला ते कमी करावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

पाकिस्तानातील इंधन नियामक संस्था OGRA ने अलीकडेच डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्याची शिफारस केली आहे. OGRA ने पेट्रोलवर प्रति लिटर 83.5 पाकिस्तानी रुपये आणि डिझेलवर 119 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर वाढ करण्याची शिफारस केली होती. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या पाकिस्तान सरकार डिझेलवर प्रति लिटर 52 पाकिस्तानी रुपये आणि पेट्रोलवर 21 पाकिस्तानी रुपये सबसिडी देते. अशा परिस्थितीत पाकिस्तान सरकार किती सबसिडी कमी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अर्र.. घ्या आता..! पाकिस्तानच देणार चीनला झटका; चीनच्या ‘त्या’ प्रकल्पाविरोधात सुरू केलीय मोठी तयारी..

Advertisement

कंगाल पाकिस्तान..! देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात; पहा, किती वाढलेय देशावरील कर्ज..

Advertisement
Advertisement

Leave a Reply