Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Adani Power News: महाराष्ट्राला अदानी झटका..! पहा कशा पद्धतीने शॉक दिलाय कंपनीने सरकारलाच

Please wait..

मुंबई : सध्या जगभरात सर्वाधिक वेगाने श्रीमंत होण्यात सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा अदानी ग्रुप तेजीत आहे. कोणत्याही संकटांना बाजूला सारून कंपनीची ही घोडदौड जोमात सुरू आहे. बंदर आणि विमानतळ ताब्यात घेण्यासह कोळसा खाणी आणि आता उर्जा क्षेत्रात ही कंपनी मुसंडी मारणार आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्यात मात्र याच दिग्गज कंपनीच्या कृपेने भारनियमन आणखी वाढणार आहे.

Advertisement
Loading...

कारण, महाराष्ट्र राज्याच्या उर्जा विभागाच्या वीजनिर्मिती कंपन्यांची २१ हजार कोटींची देणी न दिली गेल्याने अडाणी कंपनीने आता मोठा झटका दिला आहे. केंद्रातून कोळसा मिळण्यात अडचणी येत असतानाच आता अदानी आणि जिंदाल ग्रुपने राज्यावर विजतोड करून दबाव वाढवला आहे. तिरोडा प्रकल्पाची वीज तोडणी करून देणी मिटवण्यासाठी असा शॉक खासगी कंपन्यांनी दिला आहे. त्यामुळे आता यावर राज्य सरकारकडून कोणती कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (adani power and jindal group gives shock to maharashtra government)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply