Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Business Idea : फक्त 10 हजारांत सुरू होईल ‘हा’ बिजनेस, मिळेल चांगले उत्पन्न.. वाचा, महत्वाची माहिती..

अहमदनगर : सध्याच्या काळात प्रत्येकजण स्वत:चा व्यवसाय (Business) सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण फक्त नोकरीच करणे सध्याच्या काळात योग्य ठरत नाही. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग असणे किती महत्वाचे आहे, हे कोरोनाच्या संकटाने लोकांना चांगलेच शिकवले आहे. त्यामुळे प्रत्येक जण सध्या काहीतरी जोड व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यामध्ये कमी गुंतवणूक (Investment) करून जास्त नफा (Profit) मिळवता येतो. तर आज आम्ही या लेखात अशाच काही खास बिझनेस आयडिया (Business Idea) घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्हाला नव्या काही बिजनेसची माहिती होईल. जर तुम्हीही एक चांगला आणि टिकाऊ व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर खडू व्यवसाय (Chalk Business) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमी खर्चातही तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

Advertisement

खडू हे प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवलेले स्टेशनरी उत्पादन आहे. आजकाल प्रत्येक शैक्षणिक संस्थेत खडूचा वापर तुम्ही पाहिलाच असेल. हा बिजनेस सुरू करण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची तयारी करावी लागेल. सर्वात आधी आरओसीमध्ये त्याची नोंदणी करावी लागेल. तसेच, या बिजनेससाठी, आपण व्यवसायाच्या नावावर बँक खाते उघडू शकता.

Advertisement

तुम्ही खडूचा व्यवसाय सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू करू शकता आणि नंतर जास्त नफा असल्यास तुमच्या बजेटनुसार वाढ करू शकता. या बिजनेससाठी शासनाकडून आर्थिक अनुदानही दिले जाते. जर तुम्ही ते छोट्या प्रमाणावर सुरू केले तर तुम्हाला या व्यवसायासाठी 10,000 ते 30,000 रुपये गुंतवावे लागतील.

Loading...
Advertisement

खडू बनवण्याची यंत्रे जगभरात उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही खडू बनवून नफा मिळवू शकता. तसं पाहिलं तर देशातील बाजारपेठेत खडू बनवण्यासाठी दोन प्रकारची यंत्रे आहेत. एक अॅल्युमिनियम आणि दुसरे गनमेटल मशीन आहे. ही दोन्ही यंत्रे खडूसाठी योग्य मानली जातात. बाजारपेठेत या मशीन्सची किंमत लोकांसाठी अतिशय किफायतशीर आहे. या मशिन्सच्या मदतीने तुम्ही दररोज 1,20,000 ते 1,50,000 खडू तयार करू शकता. मशिन्स व्यतिरिक्त, तुम्हाला या बिजनेससाठी स्क्रॅपर्स, पेंटब्रश, ड्रायर, हातमोजे इत्यादींची देखील आवश्यकता असेल.

Advertisement

गाव किंवा शहर, कुठेही सुरू करता येतील ‘हे’ सोपे बिजनेस.. कमी गुंतवणुकीत मिळेल जास्त फायदा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply