Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून चमचमीतला बसणार झटका..! पहा कशामुळे वाढणार आहेत तेलाचे भाव

पुणे : खाद्यतेलाचे भाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. युद्धजन्य स्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि अनेक देशांमधील केंद्रीय सरकारांनी केलेले आर्थिक घोळ किंवा वाढवलेले भरमसाठ कर यामुळे आता चमचमीत खाणाऱ्यांना आणखी मोठा झटका बसणार आहे. कारण, खाद्यतेलाच्या भावात आणखी मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. (food oil crises in Indonesia, import-export having issues, rate will be high due to Russia-Ukraine War and other aspects)

Advertisement

कारण, जगभरात पाम तेलाचा निर्यातक असलेल्या इंडोनेशियात पामतेलाची टंचाई निर्माण झाली आहे. मागणीच्या ६८% तेल भारत इंडाेनेशिया व मलेशिया या दाेन देशांतून आयात करतो. तर, युद्धात अडकलेल्या युक्रेन आणि रशिया यासह अर्जेंटिना येथून सूर्यफूल तेलाची आयात भारताला करावी लागते. भारताची एकुण खाद्यतेलाची मागणी २३० लाख टन इतकी वार्षिक मागणी असून दरवर्षी १५० लाख टन खाद्यतेल आयात करावे लागते. मलेशियाची तेल निर्यातीची क्षमता खूप कमी असताना दाेन-दोन किमीपर्यंत तेल खरेदीसाठी तेथे रांगा लागल्याने इंडाेनशियाच्या राष्ट्रपतींनी शुक्रवारी पाम तेलाची निर्यात १००% बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय बाजारातील अनेक माेठ्या कंपन्यांनी तेलसाठा विक्रीला काढणे थांबवल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply