Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलच्या खर्चाचे टेन्शन होईल कमी.. ‘या’ कंपनीची दुचाकी लवकरच करणार कमाल.. जाणून घ्या, डिटेल

मुंबई : पेट्रोल-डिझेलचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आता इलेक्ट्रिक (Electric) वाहनांचा पर्याय समोर येत आहे. लवकरच इथेनॉलवर (Ethanol) चालणारी वाहनेही रस्त्यांवर दिसतील. देशात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची (Crude Oil) आयात होते. दुसरा पर्यायही नाही. देशाचे परकीय चलन कच्चे तेल खरेदी करण्यासाठीच मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. यामुळेच सरकार गेली अनेक वर्षे इंधनात इथेनॉल मिश्रणाच्या दृष्टीने काम करत आहे. आता खाजगी वाहन कंपन्यांनीही या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली आहे. देशातील दिग्गज वाहन कंपनी होंडाने (Honda) या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

Advertisement

कंपनीने सांगितले, की फ्लेक्स-इंधन (Flex Fuel Engine) कम्युटर मोटरसायकल देशात लवकरच लाँच केली जाईल. कंपनी त्यानुसार तयारी करत आहे. सध्या कंपनी ब्राजीलमध्ये फक्त फ्लेक्स-इंधन मोटरसायकल विक्री करते. एक लिटर इथेनॉलची किंमत 63.45 रुपये आहे. वाहनांमध्ये त्याचा वापर केल्याने पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

TVS मोटर कंपनी भारतात फ्लेक्स-इंधन इंजिनवर चालणारी मोटारसायकल लाँच करण्याच्या तयारीत आहे पण आता या यादीत होंडाचे नाव देखील आले आहे. कंपनीचे सीईओ म्हणाले की, भविष्यात फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञानासह अनेक इलेक्ट्रिक वाहने सादर करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, सध्या इंधनाचे दर भरमसाठ वाढले आहेत. पेट्रोल खरेदी करणे आवाक्याबाहेर होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्या दरवाढ करण्याच्या दबावात आहेत. देशात मागील दोन आठवड्यांपासून इंधनाचे भाव स्थिर आहेत. मात्र कच्च्या तेलात होणारी वाढ पाहता कंपन्या लवकरच इंधनाच्या दरात वाढ करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देशात इंधन दरवाढीने लोकांना चांगलेच हैराण केले आहे.

Advertisement

पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा आणखी एक प्लान; इथेनॉलबाबत घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply