Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेने चीनला पुन्हा फटकारले..! ‘त्या’ मुद्द्यावर चीनला दिलाय गंभीर इशारा; पहा, काय सुरू आहे जागतिक राजकारणात..

दिल्ली : अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा कठोर शब्दांत इशारा दिला आहे. रशियाचा पाठिंबा घेतल्याबद्दल अमेरिकेने चीनला फटकारले आहे. चीनने निर्बंधातून शिकावे, असे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने भारताबाबत संयमाचे धोरण घेतले आहे. भारत सध्या रशियन शस्त्रांवर अवलंबून असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेचे डेप्युटी स्पीकर शर्मन यांनी सांगितले, की चीन (China) युक्रेनमधील परिस्थिती हाताळण्यासाठी भारताला मदत करत नाही, तर तो रशियाच्या (Russia) पाठीशी उभा आहे. रशियावर ज्या प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत, ते पाहता चीन काही तरी शिकेल. रशियावर आपण काय निर्बंध लादले आहेत हे चीनने पाहिले आहे. यावरून चीनला आपल्याजवळ कोणत्या प्रकारचे पर्याय आहेत आणि गरज पडल्यास आपण काय करू शकतो याची कल्पना येईल.

Advertisement

भारताप्रती मवाळ भूमिका ठेवताना शर्मन म्हणाले, की शस्त्रास्त्रांसाठी भारताचे रशियावर अवलंबित्व जास्त आहे हे आम्हाला माहीत आहे. यासाठी आम्ही भारताला मदत करण्याचा प्रयत्न करू. असे करून आपण जागतिक पातळीवर रशियाचा शस्त्रास्त्र व्यापार कमी करू. ते म्हणाले की, भारताला हे देखील समजले आहे की शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबून राहणे फार काळ टिकणार नाही, कारण रशियाला अनेक आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.

Loading...
Advertisement

शर्मन पुढे म्हणाले, की भारत रशियाचा विरोध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) बैठकीला गैरहजर होता. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या दोन्ही नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत पीएम मोदींनी जो बायडेन यांना सांगितले की, चीनबरोबरच्या बॉर्डरचे रक्षण करण्यासाठी रशियन शस्त्रांची अधिक गरज आहे. रशियन शस्त्रे पर्यायाने जास्त खर्चिक आहेत. अमेरिकेला खरी समस्या समजली असून रशियन शस्त्रांवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

Advertisement

अमेरिकेने चीनला पुन्हा फटकारले..! चिन्यांच्या ‘त्या’ कृत्यावर दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; जाणून घ्या..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply