Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कच्चे तेल भाव 100 डॉलर पार.. तेल कंपन्यांनी इंधन दराबाबत घेतला ‘हा’ निर्णय.. वाचा, महत्वाची माहिती..

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) दररोज वाढ होत असल्याने सध्या काही दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. शनिवारीही सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून दर स्थिर आहेत. आजही दिल्ली-मुंबईसह देशातील चार मोठ्या शहरांसह अन्य प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Advertisement

गेल्या दोन आठवड्यांपासून कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, परंतु कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil Price) लवकर कमी न झाल्यास पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 105 डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे कंपन्यांवर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा दबाव आहे. मात्र, जवळपास दोन आठवड्यांपासून कंपन्यांनी तेलाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

Advertisement

दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर मिळत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर, नोएडामध्ये पेट्रोल 105.47 रुपये आणि डिझेल 97.03 रुपये प्रति लिटर झाले आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर झाले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. पाटण्यात पेट्रोल 116.23 रुपये आणि डिझेल 101.06 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.

Loading...
Advertisement

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नव्या दरानुसार अंमलबजावणी सुरू होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Advertisement

आली टेन्शन देणारी बातमी..! म्हणून देशात खाद्यतेलाचे भाव वाढण्याची शक्यता; पहा, तेलावर कोणते आहे संकट..

Advertisement

तेल कंपन्यांनी जारी केलेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर.. जाणून घ्या, भाव वाढले की घटले..

Advertisement
Advertisement

Leave a Reply