Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आली टेन्शन देणारी बातमी..! म्हणून देशात खाद्यतेलाचे भाव वाढण्याची शक्यता; पहा, तेलावर कोणते आहे संकट..

दिल्ली : महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणखी टेन्शन देणारी बातमी आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात खाद्य तेलाच्या किमती (Edible Oil Price) पुन्हा एकदा वाढू शकतात, असे दिसते. खरं तर, इंडोनेशिया (Indonesia) देशांतर्गत टंचाई कमी करण्यासाठी आणि वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी खाद्यतेल आणि त्याच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी (Oil Export) घालणार आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी ही घोषणा केली.

Advertisement

विडोडो म्हणाले, की “देशातील खाद्यतेलाची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आणि वाजवी किमतीत राखता यावी यासाठी या धोरणाच्या अंमलबजावणीचे निरीक्षण आणि मूल्यमापन करणार आहे.” हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे, जेव्हा इंडोनेशियातील लोक खाद्य पदार्थांच्या महागाईविरोधात आंदोलन करत आहेत. भारत हा खाद्यतेलाचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. भारत देशातील एकूण पामतेलच्या निम्मे तेल एकट्या इंडोनेशियाकडून खरेदी करतो. आता इंडोनेशियाने घेतलेल्या या निर्णयाचा फटका बसणार आहे. देशात पुन्हा खाद्यतेलाची टंचाई होण्याची शक्यता आहे. आधीच तेलाचे भाव खूप वाढले आहेत. त्यात आता तेलाची कमतरता निर्माण झाल्यास भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

बाजारात आवक वाढल्याने मोहरी तेल आणि तेलबियांच्या दरात घसरण झाली, तर सीपीओ आणि पामोलिन तेलाचे भावही कमी झाल्यामुळे वाढलेल्या किमती आणि परदेशातील बाजारातील घसरण यामुळे घट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तेल-तेलबियांचे उत्पादन वाढ करण्यासाठी सरकारला विशेष लक्ष द्यावे लागेल, तरच देश या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आपले परकीय चलन वाचेल. त्याच वेळी सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आणि रोजगार वाढतील. मात्र, सध्याची परिस्थिती तशी दिसत नाही. खाद्यतेलाचे संकट निर्माण होत आहे.

Advertisement

Food Oil Crises: तेलासाठी दाहीदिशा..! म्हणून खाद्यतेलासाठी तब्बल दोनेक किलोमीटर रांगा..!

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply