मुंबई : चीनी स्मार्टफोन ब्रँड Xiaomi कंपनीला देशात मोठे नुकसान झाले आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीत Xiaomi ची वार्षिक वाढ 24 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याच काळात Xiaomi चा बाजार हिस्सा 28 टक्क्यांवरून 21 टक्क्यांवर आला आहे. त्याच वेळी, Xiaomi च्या वार्षिक स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 2.5 दशलक्षचे नुकसान झाले आहे. असे असूनही, Xiaomi 21 टक्के मार्केट शेअरसह भारतातील नंबर-1 स्मार्टफोन कंपनी आहे. Xiaomi च्या मार्केट शेअरमध्ये सब-ब्रँड Poco देखील समाविष्ट करण्यात आला आहे.
स्मार्टफोन मार्केट रिसर्च फर्म Canalys च्या अहवालानुसार, जर आपण 2022 च्या पहिल्या तिमाहीत देशातील टॉप-5 स्मार्टफोन ब्रँडबद्दल माहिती घेतली तर सॅमसंग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सॅमसंग कंपनीचा बाजार हिस्साही गेल्या वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी झाला आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीत सॅमसंगचा बाजारातील हिस्सा 19 टक्के होता, जो 2022 च्या पहिल्या तिमाहीत 18 टक्क्यांवर आला आहे. तर Realme ला जबरदस्त फायदा झाला आहे.
Realme ही एकमेव कंपनी आहे जिने 2021 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2022 च्या पहिल्या तिमाहीत 40 टक्के नफा कमावला आहे. देशातील आघाडीच्या 5 स्मार्टफोन कंपन्यांबद्दल सांगितले तर Vivo या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर Oppo पाचव्या क्रमांकावर आहे. ओप्पो कंपनीच्या मार्केट शेअरमध्ये वनप्लसचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षात Vivo 15 टक्के आणि Oppo 13 टक्के कमी झाले आहे.
दरम्यान, सॅमसंग, अॅपल, शाओमी, ओप्पो, व्हीवो या कंपन्यांची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली आहे. या कंपन्या आज आघाडीवर आहेत. असे असले तरी नोकिया कंपनी पुन्हा स्पर्धेत येण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने आजच्या जमान्यातील काही दमदार स्मार्टफोन लाँच केले आहेत.
नोकियाने आपला किफायतशीर स्मार्टफोन Nokia C01 Plus लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज पर्यायामध्ये लाँच करण्यात आला आहे. हा 4G स्मार्टफोन जास्त बॅटरी लाइफसह सादर करण्यात आला आहे. फोन दोन वर्षांच्या सुरक्षा अपडेटसह येतो.
Nokia C01 Plus स्मार्टफोनची थेट स्पर्धा JioPhone Next बरोबर असेल. ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. Nokia C01 Plus स्मार्टफोनच्या 2 GB रॅम आणि 16 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,299 रुपये आहे. हाच 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंट 6,799 रुपयांना मिळेल. हा स्मार्टफोन दोन रंगाच्या पर्यायांमध्ये येईल.
वाव…आता ‘हा’ स्मार्टफोन देशात ठरलाय नंबर वन; सॅमसंग आणि शाओमीला दिलाय जोरदार झटका