Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गाव किंवा शहर, कुठेही सुरू करता येतील ‘हे’ सोपे बिजनेस.. कमी गुंतवणुकीत मिळेल जास्त फायदा..

अहमदनगर : सध्याच्या काळात प्रत्येकजण स्वत:चा व्यवसाय (Business) सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण फक्त नोकरीच करणे सध्याच्या काळात योग्य ठरत नाही. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग असणे किती महत्वाचे आहे, हे कोरोनाच्या संकटाने लोकांना चांगलेच शिकवले आहे. त्यामुळे प्रत्येक जण सध्या काहीतरी जोड व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यामध्ये कमी गुंतवणूक (Investment) करून जास्त नफा (Profit) मिळवता येतो. तर आज आम्ही या लेखात अशाच काही खास बिझनेस आयडिया (Business Idea) घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्हाला नव्या काही बिजनेसची माहिती होईल.

Advertisement

बाजारपेठेत सुक्या भाज्यांची (Vegetable) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कमी पैशात स्वतःहून काही सुरू करायचे असेल तर तुम्ही सुक्या भाजीचा व्यवसाय करू शकता. यासाठी तुम्ही थेट शेतकऱ्यांबरोबर संपर्क साधून त्यांच्याकडून स्वस्त दरात भाजीपाला विकत घेऊ शकता आणि नंतर त्यांची चांगली पॅकिंग (Packing) करून जास्त दराने बाजारात विकू शकता आणि तुम्हाला भरपूर नफा मिळू शकेल. यासाठी तुमची सुरुवातीची गुंतवणूक 40 ते 80 हजार रुपये असेल.

Advertisement

जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत तुमचे काम सुरू करायचे असेल तर तुम्ही आईस्क्रीम पार्लर (Ice cream Parlour) सुरू करू शकता. हे सुरू करण्यासाठी, तुम्हाला प्रथम एखाद्या चांगल्या ठिकाणी दुकानाची आवश्यकता असेल. यानंतर, आइस्क्रीम बनवण्याची उपकरणे, मशीन आणि फ्रीज जेणेकरून तुम्हाला आइस्क्रीम व्यवस्थित साठवता येईल. यासाठी तुमची सुरुवातीची गुंतवणूक 1 ते 2 लाख रुपये असेल.

Loading...
Advertisement

कार्यालयीन कामकाजासाठी आजही लिफाफ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा बिजनेस खूप कमी पैशात तुम्ही सुरू करू शकता. लिफाफे तयार करण्याचे प्रशिक्षण (Training) घेतल्यानंतर तुम्ही अगदी घरातूनही हा बिजनेस सुरू करू शकता. स्टेशनरी साहित्याची दुकाने, सरकारी आणि खाजगी कार्यालये, कंपन्या याठिकाणी संपर्क साधून बिजनेस विस्तार करू शकता. कारण, याठिकाणी लिफाफ्यांना नेहमीच मागणी असते.

Advertisement

गावात सुरू करता येतील ‘हे’ बिजनेस; मिळेल हमखास उत्पन्नाची हमी; वाचा, महत्वाची माहिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply