Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियासोबतच्या व्यवसायाबाबत ‘टाटा’चा मोठा निर्णय, कंपनीवर काय परिणाम होणार ..?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. त्याचे चटके साऱ्या जगाला बसत आहेत.. रशियाच्या हल्ल्यात युक्रेन अक्षरक्ष: बेचिराख झालाय.. या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले आहेत. भारताचे रशियासोबत मित्रत्वाचे संबंध असले, तरी काही दिवसांपूर्वी देशातील आघाडीची आयटी कंपनी ‘इन्फोसिस’ने रशियासोबतचा व्यवसाय संपवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ‘इन्फोसिस’च्या पावलावर पाऊल ठेवत, भारतातील प्रमुख पोलाद कंपनी टाटा स्टीलनेही रशियासोबतचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय स्टील कंपनीने बुधवारी (ता. 20) याबाबतची माहिती दिली.

Advertisement

टाटा स्टीलच्या युरोपीयन शाखेनं म्हटलं आहे, की ते रशियासोबत व्यवसाय करणे थांबवत आहेत. टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे की, “रशियामध्ये टाटा स्टीलचे कोणतेही काम किंवा कर्मचारी नाहीत. आम्ही रशियासोबतचा व्यवसाय बंद करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. भारत, यूके आणि नेदरलँड्समधील कंपनीच्या सर्व स्टील उत्पादन साइट्सने रशियावरील त्यांचे अवलंबित्व संपवण्यासाठी कच्च्या मालाचा पर्यायी पुरवठा केला आहे. यामुळे त्यांचे रशियावरील अवलंबित्व संपुष्टात आले आहे. टाटा कंपनीने विविध कामांसाठी रशियाकडून मर्यादित प्रमाणात कोळसा खरेदी केला आहे.

Advertisement

टाटा स्टीलचे संचालक मंडळ 3 मे रोजी कंपनीच्या शेअर्सचे वितरण करण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. याबाबत कंपनीने नुकतीच माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे, की 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील आर्थिक निकालांवर संचालक मंडळ 3 मे रोजी होणाऱ्या बैठकीत विचार करणार आहे. कंपनीने सांगितले की, बैठकीत संचालक मंडळाने ठरवलेल्या पद्धतीने 10  रुपये मूल्याचे शेअर्स विभाजित करण्याचा विचार केला जाईल. यासाठी नियामक मंजुरींशिवाय भागधारकांचीही मान्यता घेतली जाणार आहे. बैठकीत संचालक मंडळ 2021-22 या आर्थिक वर्षासाठी लाभांशाची शिफारस देखील करू शकते.

Loading...
Advertisement

अलीकडेच ‘इन्फोसिस’ने रशियासोबतचा व्यवसाय संपवण्याची घोषणा केली होती. पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी भारताला या युद्धाविरोधात बोलण्याचे आवाहन केलं आहे. तसेच अनेक पाश्चात्य कंपन्यांनी देखील रशियात व्यवसाय बंद केले आहेत.

Advertisement

कोरोनावरील उपचारासाठी मंत्र्यांचा सरकारी तिजोरातून लाखोंचा खर्च, कोणी किती रुपये खर्च केले, पाहा यादी..!
बाब्बो.. भारताने ‘या’ देशाला पु्न्हा दिलेत तब्बल 50 कोटी डॉलर; पहा, चीनच्या कृपेने कोणते संकट आलेय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply