Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनीही केले मान्य.. ‘त्या’ मुद्द्यावर दिलाय गंभीर इशारा; जाणून घ्या..

दिल्ली : पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सांगितले की, पाकिस्तान कर्जात (Loan) बुडत आहे आणि हे देशासाठी चांगले नाही. मात्र आता या संकटातून देशाला बाहेर काढण्याचे काम नव्या सरकारचे आहे. पाकिस्तानला आपली परिस्थिती लवकर सुधारावी लागेल अन्यथा त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. त्यांचे भाषण राज्य माध्यमांनी प्रसारित केले. मंत्रिमंडळाला मार्गदर्शन करताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की, वीज टंचाई आणि प्रचंड कर्ज हे देशासमोरील प्रमुख समस्या आहेत. देशावरील कर्जही वाढले आहे. त्यामुळे आणखी समस्या निर्माण होत आहेत. पण आता आपल्याला या परिस्थितीत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement

पाकिस्तानला कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढायचे असेल तर सरकारला गैर-विकास खर्च कमी करावा लागेल, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय निर्यातीत (Increase in Export) वाढ करावी लागेल आणि आयात कमी करावी लागेल. तसेच स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले पाहिजे. फेडरल ब्युरो ऑफ रेव्हेन्यूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून कर न देणाऱ्यांना कराच्या कक्षेत आणले पाहिजे. विकासाच्या उद्देशाने सरकारने सौम्य अटींवरच कर्ज घ्यावे, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

पाकिस्तानमधील अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि निधी उभारण्याचे इतर मार्ग शोधले पाहिजेत. त्यांनी जलविद्युत आणि खनिज समृद्ध देशासाठी अधिक आर्थिक संसाधने निर्माण करण्याचे आणि जास्त दराच्या विदेशी कर्जावरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन केले. उपलब्ध आर्थिक स्रोतांचा योग्य वापर, भ्रष्टाचार (Corruption) रोखणे आणि सुशासनाला चालना देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Loading...
Advertisement

पाकिस्तानच्या नव्या सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अधिकाऱ्यांबरोबर पुन्हा चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून वॉशिंग्टनमध्ये नव्या सरकारची IMF अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होणार असून, त्यात IMF कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दरम्यान IMF पाकिस्तानला (Pakistan) एक अब्ज डॉलर्सचा हप्ता देण्याचा निर्णय घेईल, असे मानले जात आहे.

Advertisement

कंगाल पाकिस्तान..! देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात; पहा, किती वाढलेय देशावरील कर्ज..

Advertisement
Advertisement

Leave a Reply